नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी पहिल्याच फेरीत पुढे

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी पहिल्याच फेरीत पुढे

पहिली फेरी झाल्यानंतर कर्जत-जामखेडमध्ये पवार समर्थकांनी जल्लोष केला.

नगर : नगर जिल्ह्यातील निकाल धक्कादायक लागणार असल्याची चिन्हे आहेत. पहिल्याच फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार, संग्राम जगताप, निलेश लंके, प्रताप ढाकणे, आशुतोष काळे तसेच राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शंकरराव गडाख आघाडीवर आहेत. 

पहिली फेरी झाल्यानंतर कर्जत-जामखेडमध्ये पवार समर्थकांनी जल्लोष केला. तेथे पवार ३००० मतांनी आघाडीवर आहेत. तेथील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांना पहिल्याच फेरीत धक्का बसला. पारनेर तालुक्यात निलेश लंके यांनी १६०८ मतांनी आघाडी घेतल्याने विधानसभेचे उपाध्यक्ष शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांना धक्का मानला जात आहे. अशीच स्थिती शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाची आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या मोनिका राजळे यांना पहिल्याच फेरीत धक्का दिला आहे. तेथे राष्ट्रवादीचे अॅड. प्रताप ढाकणे ५००० मतांनी पुढे आहेत. कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनाही पहिल्या फेरीत पिछाडीवर टाकल्याने निकाल धक्कादायक दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे आशुतोष काळे ४९४ मतांनी पुढे आहेत. नगर शहरात आमदार संग्राम जगताप ६२७ मतांनी पुढे आहेत. तेथील शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांना त्यांनी पिछाडीवर टाकले आहे. राहुरीत प्राजक्त तनपुरे ४८० मतांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यापेक्षा पुढे आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com