राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून नव्या सरकारला ट्वीटर शुभेच्छा

आज दुपारी शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. या शपथ सोहोळ्याची जय्यत तयारी शिवतीर्थावर सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे व नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.
Stage Set for Uddhav Thakrey Swearing in Ceremony
Stage Set for Uddhav Thakrey Swearing in Ceremony

मुंबई : आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु. अभिनंदन, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नव्या सरकारचे स्वागत केले आहे.

आज शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे.  आज दुपारी शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. या शपथ सोहोळ्याची जय्यत तयारी शिवतीर्थावर सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे व नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. 

आज एका नवीन शिव पर्वाची सुरवात होते आहे उद्धवजी आपण महाराष्ट्रा ला एका वेगळ्या उंची वर घेऊन जाल ह्यात शंका नाही  रयतेचे राज्य ही पवारसाहेबांची संकल्पना त्यांच्या मार्गदरशना खाली साकार कराल हा महाराष्ट्राला विश्वास आहे आपल्याला खूप शुभेच्छा 

How is Josh असे विचारत संजय राऊत यांनी भाजपला पुन्हा खिजवले आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आता सामना संपादक पदावर रहाणार नाहीत. सामनाच्या संपादक पदाची धुरा आता कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com