शिवसेना का?..तर जयंत पाटील म्हणतात....दगडापेक्षा वीट मऊ

''आम्ही भाजपच्या विरोधात लढलो. त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार नाही,'' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे सांगितले. मग शिवसेनेबरोबर कसे जाणार, असे विचारले असता ''दगडापेक्षा वीट मऊ,''असे उत्तर त्यांनी दिले.
NCP State President Jayant Patil
NCP State President Jayant Patil

पुणे : ''आम्ही भाजपच्या विरोधात लढलो. त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार नाही,'' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे सांगितले. मग शिवसेनेबरोबर कसे जाणार, असे विचारले असता ''दगडापेक्षा वीट मऊ,''असे उत्तर त्यांनी दिले. 

पुण्यात मोदी बाग येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. जयंत पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक उपस्थित आहेत.

या बैठकीबाबत जयंत पाटील म्हणाले, "महत्वाच्या नेत्यांची बैठक आहे. भाजप मध्ये गेलेले आणि काही अपक्ष आमच्या संपर्कात आहेत. आम्ही मेगाभारती करणार नाही तर मेरिट भरती करु. आम्ही जनतेच्या मनातील सरकार देणार आहोत. आमचे स्थिर सरकार देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.'' आमची अजून प्राथमिक चर्चा झालेली नाही ती झाली की घटक पक्षाला बरोबर घेऊ जनतेच्या मनातील सरकार आणू, असेही त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com