NCP leaders feel that shrirampur MLA should be from their party | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते श्रीरामपूराचा आमदार आमचाच हवा,पण ..

मुरलीधर कराळे
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

आमदार भाऊसाहेब कांबळे हे काँग्रेसतर्फे लागोपाठ दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत . काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण् विखे पाटील यांचे त्यांना भक्कम पाठबळ राहिलेले आहे .

नगर :  श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात विधानसभेची तयारी जोरात सुरू आहेआमदार भाऊसाहेब कांबळे हेच पुन्हा काॅंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवार असतीलहे जवळजवळ निश्चित आहेआघाडीत ही जागा काॅग्रेसकडे आहेपण राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते ती राष्ट्रवादीला मिळावी

आमदार भाऊसाहेब कांबळे हे काँग्रेसतर्फे लागोपाठ दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत . काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण् विखे पाटील यांचे त्यांना भक्कम पाठबळ राहिलेले आहे . त्यामुळे भाऊसाहेब कांबळे यंदा विजयाची हॅट्ट्रिक साधणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे . 

श्रीरामपूर येथील नुकत्याच झालेल्या बुथ संकल्प मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी ही इच्छा व्यक्तही केली होती.जागा वाटपात  हा मतदारसंघ काॅंग्रसकडे आहेअनुसुचित जाती-जमातीसाठी राखीव आहेगेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या मनात सल आहेपक्षसंघटना बळकट करण्यासाठी मर्यादा येत आहेतनवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावेअशी मागणी आदिक यांनी केली.

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला आव्हान देऊ शकेल असा तुल्यबळ  उमेदवार  भाजपकडे अजून  नाहीभाजपकडून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅवसंत जमदाडे हे प्रयत्न करू शकतात. लोकसभेचे तिकिट मिळाले नाहीतर माजी खासदार भाऊसाहेब वाकचाैरे हेही उमेदवारी करू शकतातवाकचाैरे यांनी विधानसभेची उमेदवारी केलीतर लढत मोठी होऊ शकतेमात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील कोणाला सहकार्य करतातयावरच मतदारसंघाचा आमदार कोण होणारहे अवलंबून आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख