मुंबई : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते विजयराज खुळे आज शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ते शिवबंधनात अडकणार आहेत.
अलीकडेच सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे , भाऊ अनिल तटकरे तसेच जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला . त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांना जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. विजयराज खुळे हे मूळचे शिवसैनिक असून राज्यातील शिवसेनेचे पहिले जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. ते दक्षिण रायगडातील बडे राजकीय प्रस्थ असून जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती .
हे देखिल वाचा - विखेंच्या भाजप प्रवेशामुळे शिर्डीत काँग्रेसची ताकद क्षीण
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.