बाळासाहेबांच्या राजकारणाच्या स्टाईलचं मला नेहमीच कौतुक - रोहित पवार

महाराष्ट्राच्या या भूमीला रत्नांची खाण म्हणलं जातं. स्व.यशवंतराव चव्हाण साहेब, स्व.बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्याप्रमाणेच अनेक रत्ने या महाराष्ट्राच्या भूमीने देशाच्या राजकारणाला दिली. मला या सर्वच लोकांच विशेष यासाठी वाटतं कि हे सर्वजण आपल्या निर्णयावर नेहमीच ठाम असत. प्रत्येक निर्णय घेताना लोकांच भलं करणं हाच एकमेव विचार त्यांच्या मनात असे - रोहित पवार
NCP Leader Rohit Pawar Pays Tribute to Balasaheb Thakrey
NCP Leader Rohit Pawar Pays Tribute to Balasaheb Thakrey

पुणे : मी कॉलेजसाठी मुंबईला होतो. मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे हे समीकरण अगदी लहानपणापासून मनात कोरलेलं होतं. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाच्या स्टाईलचं मला नेहमीचं कौतुक वाटतं आलं आहे. माझ्या मुंबईतल्या काळात स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या या राजकारणाची स्टाईल जवळून पाहता आणि अनुभवता आली, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांन स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली आहे. 

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात......महाराष्ट्राच्या या भूमीला रत्नांची खाण म्हणलं जातं. स्व.यशवंतराव चव्हाण साहेब, स्व.बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्याप्रमाणेच अनेक रत्ने या महाराष्ट्राच्या भूमीने देशाच्या राजकारणाला दिली. मला या सर्वच लोकांच विशेष यासाठी वाटतं कि हे सर्वजण आपल्या निर्णयावर नेहमीच ठाम असत. प्रत्येक निर्णय घेताना लोकांच भलं करणं हाच एकमेव विचार त्यांच्या मनात असे. म्हणूनच राजकारणाचा फायदातोटा न पहाता बाळासाहेबांनी प्रसंगी कॉंग्रेसला देखील पाठिंबा देवू केला. प्रतिभाताई पाटील, तसेच प्रणब मुखर्जी यांसारखे व्यक्ती राष्ट्रपती व्हावेत म्हणून अगदी खुल्या मनाने पाठिंबा दिला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा वेळोवेळी सन्मान केला आहे. मा.अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेत सत्ता असताना काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त कलादालन उभा करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला होता. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने असणाऱ्या या कला दालनाचे उद्घाटन आदरणीय पवार साहेबांनी केले होते. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीनिमित्त उभा करण्यात आलेली ही कदाचित महाराष्ट्रातील पहिली वास्तू असेल.

थेट भूमिका घेणारी अशी माणसं महाराष्ट्राला लाभली हे आपलं भाग्य आहे असे मी समजतो. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com