राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे ठरल्या हजार कुटुंबांना आधार!

राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी गरजू रिक्षाचालकांसह एक हजार कुटुंबांना अन्न-धान्याचे वाटप केले. थोडक्‍यात या कठीण काळात त्या हजार कुटुबांचा आधार ठरल्या आहेत
NCP Leader from Nashik Prerana Balkawde Helping Poor
NCP Leader from Nashik Prerana Balkawde Helping Poor

नाशिक : "कोरोना' विषाणूशी दोन हात करताना या लढाईत लहान, मोठे सगळेच सहभागी झाले आहेत. मात्र एक दोन नव्हे, तर तब्बल एकवीस दिवसांचा लॉकडाऊन आहे. रिक्षाचालक, गरीबांचा रोजगार गेला, उत्पन्न बंद झाले. त्यांच्यापुढे जगण्याचा प्रश्‍न होता. या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे त्यांच्यासाठी मदतीचा हात घेऊन पुढे आल्या आहेत. त्यांनी या सर्व रिक्षाचालकांसह एक हजार कुटुंबांना अन्न-धान्याचे वाटप केले. थोडक्‍यात या कठीण काळात त्या हजार कुटुबांचा आधार ठरल्या आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आणि देशात लॉकडाउन करण्यात आले. हातावर पोट असणाऱ्या लोकांसमोर रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. रोजंदारीवर काम करणारे मजुर, गोर गरिब लोकांना दोन वेळ पोट भरणेही अवघड झाले आहे. कोरोनासारख्या भंयकर संकटाच्या वेळी मात्र, माणुसकी धावून आल्याचे चित्र भगूर शहरात दिसले. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ बलकवडे यांनी 'एक हात मदतीचा' या संकल्पनेतून गावातील शंभर रिक्षाचालक तसेच नऊशे गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप केले.

अन्नधान्याचे वाटप

सौ. बलकवडे यांच्या झेप फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. लॉकडाउन झाल्यामुळे या लोकांची उपासमार होऊ लागली. हाताला काम नाही आणि केलेल्या कामाचा पैसाही नाही. याचा विचार करून नेहमी लागणारे किराणा गहू, तांदूळ, आदी वस्तू प्रामुख्याने देण्यात आल्या. या संकटाच्या काळात सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून सुज्ञ नागरिकांनी घरात रहा सुरक्षीत रहा असा संदेश दिला.

प्रत्येकाने जर ठरवले आणि कुटुंबाना मदत केली तर महाराष्ट्रात कोणीही उपाशी झोपणार नाही. त्यामुळ जास्तीत जास्त लोकांनी 'एक हात मदतीचा' देऊन माणुसकीच्या नात्याने गरजुंना मायेचा घास भरवावा अशी विनंती प्रेरणा बलकवडे यांनी या वेळी केली.

सौ बलकवडे राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच त्यांच्या झेप फाऊंडेशनच्या ामध्यमातून महिला व नागरीकांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. त्यात भगूरचे माजी नगराध्यक्ष ऍड बलकवडे यांसह त्यांचे सबंध कुटंबीय नेहेमीच खंबीर पाठींबा देत असतात. राजकीय कार्यक्रम असो वा पक्षाचे उफक्रम त्यात त्या आघाडीवर असतात. मात्र "कोरोना' विरुद्धच्या सध्याच्या लढ्यात त्या गाव व परिसरातील एक हजार कुटुंबांच्या पोशिंद्या ठरल्याने त्यांनी वेगळेच समाधान व्यक्त केले.

या वेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ प्रेरण बलकवडे, पहिलवान विशाल बलकवडे, बलकवडे व्यायामशाळेचे संचालक अॅड. गोरखनाथ बलवडे, रिक्षा संघटनेचे आध्यक्ष विजय मराठे, राहुल कापसे, अक्षय शेळके, अनिल पवार, योगेश लकारिया आदिंसह विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com