राष्ट्रवादीचा नेत्याचा व त्याच्या वडिलांचा खून : पोटच्या मुलांनीच केले कृत्य

मुलांनीच केली होती तक्रार...
राष्ट्रवादीचा नेत्याचा व त्याच्या वडिलांचा खून : पोटच्या मुलांनीच केले कृत्य

नाशिक : हॉटेलविक्रीसाठी प्रयत्न करणाऱ्या वडिलांचा मुलांनीच खून केल्याचा प्रकार नाशिक येथे घडला. राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे नेते ज्ञानेश्‍वर फोकणे व त्यांचे वडील  काशिनाथ फोकणे यांच्यावर झोपेतच त्यांच्या तीन मुलांनी सशस्त्र हल्ला करुन त्यांचा खून केला. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ज्ञानेश्‍वर फोकणे यांचे घोटी (इगतपुरी) येथील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाजवळ हॉटेल व्यवसाय होता.  ते कर्जबाजारी झाले होते. त्यासाठी ते हॉटेल विक्रीचा विचार करीत होते. त्याला कुटुंबातील इतर सदस्यांचा विरोध होता. या नाराजीतुनच त्यांच्यात वाद सुरु होते. शुक्रवारी रात्री ज्ञानेश्‍वर फोकणे मळ्यात राखणदारीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे वडील काशिनाथ (वय 69) होते. यावेळी किरण, प्रमोद व नितीन या तिघा भावांनी रात्री दिडच्या सुमारास वस्तीवर गेले. तेथे झोपेत असलेल्या फोकनेंना व त्यांच्या वडिलांनी तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन ठार केले. त्यानंतर ते पसार झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी यातील एकाने गावात जाऊन वडिल व अजोबांची हत्या झाली आहे अशी माहिती दिली. यामध्ये आपल्याला काहीच माहिती नसल्याचे त्यांनी भासवले. मात्र त्यांच्याविषयी संशय आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यावर हा सगळा प्रकार उघड झाला.

ज्ञानेश्‍वर फोकणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष होते. इगतपुरी तालुक्‍याच्या पूर्व भागातील घोटी खुर्द येथील ज्ञानेश्वर काशिनाथ फोकणे हे वडील, पत्नी, तीन मुलगे व सून यांच्यासह राहत होते. त्यांची शेती असून, वडील काशीनाथ वामन फोकणे एकटे राखणीसाठी मळ्यात राहायचे. ज्ञानेश्वर फोकणे यांनी एसएमबीटी परिसरात हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. त्यांचा संपूर्ण परिवार तेथे जाऊन-येऊन वास्तव्यास असायचा. शुक्रवारी रात्री परिवाराने जेवण केल्यावर दहाच्या सुमारास सर्व जण हॉटेलकडे निघून गेले. ज्ञानेश्वर फोकणे हे वडिलांना सोबत म्हणून मळ्यात मुक्कामी थांबले होते. प्रारंभी याविषयी राजकीय वादाचा संशय होता. त्यांच्या मारेकऱ्यांच्या शोधाचे आव्हान वाडीवऱ्हे पोलिसांसमोर होते. त्यांनी अगदी अल्पावधीत या खुनाचा तपास पुर्ण केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com