... शरद पवार यांच्यामुळे माझा राजकीय पुर्नजन्म : छगन भुजबळ झाले भावूक 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज मुंबईत मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी पुण्यात समता भूमीवर बोलताना त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली
NCP Leader Chagan Bhujbal Thanks Sharad Pawar
NCP Leader Chagan Bhujbal Thanks Sharad Pawar

पुणे  : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे आज माझा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीदिनीच माझा राजकीय पुर्नजन्म झाल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि नियोजित मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (ता.२८ ) पुण्यात सांगितले. त्यामुळे मी शरद पवार,  समता परिषदेचे कार्यकर्ते आणि येवल्याचे मतदार यांचे जाहीर आभार मानत असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले. हे सांगताना आणि आभार मानताना भुजबळ प्रचंड भावूक झाले.            

पुण्यातील समता भूमित आज भुजबळ यांच्या हस्ते ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा महात्मा फुले समता पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.      

भुजबळ म्हणाले, "मी कारागृहात असताना समता परिषदेचे सर्व कार्यकर्ते हे माझ्या आणि माझ्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले आणि मला धैर्य व धीर दिला. यामुळे या कार्यकर्त्यांचे, येवला मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि प्रचंड मतांनी पुन्हा आमदार केले आणि शरद पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी देऊन, माझा राजकीय पुर्नजन्म केला आहे. त्यामुळे या सर्वांचे मी आभार मानतो."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com