अजित पवारच होणार उपमुख्यमंत्री? आज शपथविधी होणार?

अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात भाजपबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर वेगवान राजकीय हालचाली झाल्या आणि अजित पवार पदाचा राजीनामा देऊन पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात परतले. त्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
Ajit Pawar will be Deputy Chief Minister in New Cabinet
Ajit Pawar will be Deputy Chief Minister in New Cabinet

मुंबई : शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नव्या सरकारमध्ये अजित पवार हेच उपमुख्यमंत्री असतील असे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पदासाठी जयंत पाटील यांचेही नाव पुढे येत होते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री पद कुणाकडे असेल याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. अजित पवार यांना हे पद द्यावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

दरम्यान, आज होणाऱ्या शपथविधी सोहोळ्यात उपमुख्यमंत्री पद कुणाकडे जाणार याची उत्सुकता ताणली गेली होती. अजित पवार यांना हे पद मिळणार की अन्य कुणाला याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र, हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच घेतील, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सकाळीच पत्रकारांना सांगितले होते. 

अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात भाजपबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर वेगवान राजकीय हालचाली झाल्या आणि अजित पवार पदाचा राजीनामा देऊन पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात परतले. त्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com