नरेंद्र घुलेंना लागले विधानपरिषदेचे वेध

महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार येत आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. विधानसभा निवडणुकीत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून नरेंद्र घुले किंवा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती.
NCP Ex MLa Narandra Ghule Eyes on Legislative Council Seat
NCP Ex MLa Narandra Ghule Eyes on Legislative Council Seat

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा मिळविण्यात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या माजी आमदार नरेंद्र घुले यांना विधानपरिषदेचे वेध लागले आहेत. याबाबत लवकरच कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार असल्याचे समजते.

महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार येत आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. विधानसभा निवडणुकीत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून नरेंद्र घुले किंवा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, त्यांनी या उमेदवारीला नकार देत अॅड. प्रताप ढाकणे यांना उमेदवारी दिली. थोड्या फरकाने ढाकणे यांचा पराभव झाला असला, तरी घुले बंधुंनी राष्ट्रवादीचे काम जोमाने केले. शेवगावमधून मताधिक्य देण्याची कामगिरी त्यांनी केली. 

नेवासे मतदारसंघात राष्ट्रवादीप्रणित आमदार शंकरराव गडाख यांना मदत करून निवडून आणण्याचे कसब दाखवून दिले. या बरोबरच कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. कारण आमदार काळे हे चंद्रशेखर घुले यांचे जावई आहेत. याबरोबरच राहुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार प्राजक्त तनपुरे यांना निवडून आणण्यासाठीही घुले बंधुंनी मोठी मदत केली. कारण आमदार तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच जयंत पाटील हे नरेंद्र घुले यांचे मेव्हणे आहेत. पाटील यांची बहिण नरेंद्र घुले यांच्या पत्नी आहेत. असे नातेगोते जपत घुले पाटील यांनी निवडणुकीपासून अलिप्त राहत राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना निवडून येण्यात मोलाचा वाटा उचलला.

मेव्हणे मदत करणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्खे मेव्हणे असलेले नरेंद्र घुले यांना विधानपरिषदेवर घेण्यासाठी जयंत पाटील मदत करणार असल्याचे समजते. त्यासाठी अंतर्गत मोर्चेबांधणी सुरु असल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेवगाव तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे यांनीही प्रदेशाध्यक्षांना यापूर्वीच निवेदन देऊन घुले यांच्या नावाची मागणी केली आहे. लवकरच शेवगाव तालुक्यातील शिष्यमंडळ शरद पवार यांना भेटणार असल्याचे त्यात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com