हर्षवर्धन पाटील यांच्या मेळाव्याकडे राष्ट्रवादीचे लक्ष

हर्षवर्धन पाटील यांच्या मेळाव्याकडे राष्ट्रवादीचे लक्ष

वालचंदनगर : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांच्या जनसंकल्प मेळाव्याकडे  इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

पाटील यांनी इंदापूर येथे बुधवारी (ता.४) जनसंकल्प मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पाटील पुढील राजकारणाची दिशा ठरविणार आहेत.

सध्या राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे हे तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत. राज्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस पक्षाची आघाडी होण्याची शक्यता असून इंदापूरची जागा राष्ट्रवादी कॉग्रेस सोडण्याच्या मन:स्थितीत नाही. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसने इंदापूर तालुक्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा घेवून भरणे यांच्या उमेदवारीवर अप्रत्यक्ष शिकामोर्तब करुन प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.

राष्ट्रवादीला इंदापूरची जागा सोडायची असती तर शिवस्वराज्य यात्रा इंदापूर तालुक्यात आलीच नसती, अशी चर्चा तालुक्यात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून आघाडीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले होते. लोकसभा निवडणुकीत सुळे यांना तालुक्यातून ७० हजारपेक्षा जास्त मताधिक्य ही मिळाले होते. मात्र विधानसभेला राष्ट्रवादी कॉग्रेस जागा सोडणार नसल्याचे चिन्हे दिसत असल्याने पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश करण्याचा आग्रह धरला आहे.

पाटील यांनी नुकताच इंदापूर तालुक्यातील गावभेटी दौरा पूर्ण केला असून दौऱ्यामध्ये पाटील यांच्या  गावोगावीच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील हाच आमचा पक्ष असल्याचे सांगितले होते. तसेच पाटील यांनीही जनता सांगेल त्या पक्षातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली असल्याचे पाटील यांची भाजपच्या प्रवेशाच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याची चर्चा आहे. त्यांनी भाजप अथवा दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास  इंदापूरच्या जागेचा पेच  आपोआपच सुटणार असल्याने राष्ट्रवादीचे मेळाव्याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीमधून आमदार दत्तात्रेय भरणे, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com