नाना पटोले काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी आज दि.३० नोव्हेंबर २०१९ रोजी सभागृहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावे,असा पक्षादेश काढला आहे.
Nana Patole to File Nomination for Assembly Chairman Post From Congress
Nana Patole to File Nomination for Assembly Chairman Post From Congress

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजप कडून किसन कथोरे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी आज दि.३० नोव्हेंबर २०१९ रोजी सभागृहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावे,असा पक्षादेश काढला आहे. 

याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. महाविकास आघाडीकडे 170 चा  आकडा आहे. विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच होईल..भाजप ने उमेदवार दिला असला तरीही त्यांचा पराभव निश्चित आहे. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पद कोणाकडे असावे याकरिता सिल्वर ओक वर चर्चा सुरू असावी. विश्वासदर्शक ठरावापूर्वी महाविकास आघाडीची बैठक होईल. 

राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ म्हणाले, "विश्वासदर्शक ठराव न मांडता आल्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार पडले. आज आम्ही बहुमत सिद्ध करू. आज काठावर किती लोक आहेत हे सांगून मला संभ्रम तयार करायचा नाही. आकडा 165 च्या वर जाऊ शकतो. पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास नको म्हणून मेट्रो कारशेडला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com