राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत  लवकरच मोठे फेरबदल 

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत  लवकरच मोठे फेरबदल 

मुंबई : पक्ष बळकटीकरणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुरू करण्यात आलेला राज्यव्यापी दौऱ्याची सांगता आज ठाण्यात होत असून विदर्भ आणि उर्वरित जिल्ह्यांच्या दौऱ्यांचा अंतिम टप्पा पावसाळी अधिवेशनानंतर सुरू होणार आहे. या दौऱ्यानंतर लगेचच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जिल्हास्तरापासून ते तालुकास्तरापर्यंतच्या कार्यकारिणीत अनेक मोठे फेरबदल केले जाणार आहेत. 

या फेरबदलासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीकडून आढावा बैठका घेण्यात आल्या असून त्यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांना आपाआपल्या कामांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पाळेमुळे शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत पुन्हा घट्ट रुजविण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यव्यापी दौऱ्यांची सुरूवात महिनाभरापासून सुरू आहे. प्रत्येक जिल्हा पिंजून काढला जात आहे. या दौऱ्याचा दुसरा टप्पा ठाण्यात पूर्ण होत आहे. यानंतर राष्ट्रवादीकडून पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी आणि इतर काही प्रश्‍नावर सरकारला घेरण्याची तयारी करण्यासाठी मुंबईत बैठका होणार असून त्यातच शनिवारी 22 जुलैपासून 'गाव तिथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची शाखा, घर तिथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा झेंडा' हा राज्यव्यापी कार्यक्रम राबविला जाणार आहे. 

हा कार्यक्रम पक्षाचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 22 जुलैपासून सुरू केला जाणार आहे. तो पुढील महिनाभर चालविला जाणार असून यात अनेक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली. 

दरम्यान, पावसाळी अधिवेशनानंतर राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांकडून विदर्भातील सर्व जिल्हे पिंजून काढले जाणार असून तिथल्या शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार आदींचे प्रश्‍न समजून घेऊन त्यावर राष्ट्रवादीकडून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com