ncp has done lot of work for hadapsar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नागपूर - दक्षिण पश्चिम मतदार संघ : पाचव्या फेरीत मुख्यमंत्री 11084 मतांनी पुढे
चंद्रकांत पाटील यांना सहाव्या फेरीअखेर ११ हजार, ५६५ मतांची आघाडी
मुक्ताईनगर सहाव्या फेरीत रोहिणी खडसे 2633 मतांनी पुढे
जालना: अर्जुन खोतकर कैलास गोरंट्याल यांच्यात कडवी झुंझ
ऐरोली - गणेश नाईक 16308 मतांनी आघाडीवर
कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांची आघाडी कायम आठव्या फेरीअखेर 12915 मतांची आघाडी
बारामतीत सहाव्या फेरी अखेर अजित पवार 35578 मतांनी आघाडीवर
भोसरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर महेश लांडगे १२ हजार ७१९ मतांनी आघाडीवर
सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप उदयनराजे भोसले 14000 मतांनी पिछाडीवर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

`राष्ट्रवादीच्या माध्यमातून हडपसरमध्ये विकासकामे`

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

हडपसर : हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. माझे वडील स्व. खासदार विठ्ठलराव तुपे यांनी नेहमीच विकासाचे राजकारण करावे, असे बाळकडू मला दिले आहे. त्यांचे हे संस्कार माझ्या पाठीशी असल्याने मी माझे कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत कायम जागरूक असतो, अशी माहिती हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी दिली.

मगरपट्टा, लोहियानगर, माळवाडी, डीपी रोड, अमर कॉटेज, भोसले गार्डन या भागांत तुपे यांनी प्रचारफेरीद्वारे जनतेशी संवाद साधला. या वेळी तुपे बोलत होते.

तुपे म्हणाले, की हडपसर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रती माझी कर्तव्ये मी जबाबदारीने पार पाडेन, हा माझा शब्द आहे. असे भावुक उद्गार काढत त्यांनी या वेळी जनतेशी संवाद साधला.

याप्रसंगी नगरसेवक बंडूतात्या गायकवाड, नगरसेविका हेमलता मगर, पूजा कोद्रे, अशोक कांबळे, राजलक्ष्मी भोसले, योगेश ससाणे, वासंती काकडे, मंगेश तुपे, प्रवीण तुपे, निलेश मगर, संदीप तुपे, प्रशांत तुपे, चंद्रकांत कवडे, बंडू तुपे, संजय शिंदे, बाळासाहेब तुपे, समीर कोद्रे, हनुमंत तुपे, प्रदीप मगर, दत्तात्रेय तुपे, बाळासाहेब जाधव, विजय तुपे, अविनाश काळे, भाऊ तुपे, प्रशांत पवार, रूपेश तुपे, कुमार तुपे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, रिपाई जोगेंद्र कवडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख