मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून भाजपचे सुनील शेळके यांना उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेसने आज (गुरुवार) आपली दुसरी यादी जाहीर केली असून, यामध्ये 20 उमेदवारांचा समावेश आहे. खेड-आळंदीतून दिलीप मोहीते, नांदगावमधून पंकज भुजबळ, मावळमधून सुनील शेळके, माढ्यातून बबनराव शिंदे, माळशिरसमधून उत्तम जानकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
Sunil Shelke - Sulakshana Shilwant Dhar
Sunil Shelke - Sulakshana Shilwant Dhar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आज (गुरुवार) आपली दुसरी यादी जाहीर केली असून, यामध्ये 20 उमेदवारांचा समावेश आहे. खेड-आळंदीतून दिलीप मोहीते, नांदगावमधून पंकज भुजबळ, मावळमधून सुनील शेळके, माढ्यातून बबनराव शिंदे, माळशिरसमधून उत्तम जानकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

राष्ट्रवादीने बुधवारी 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, येवल्यातून छगन भुजबळ, बारामतीमधून अजित पवार, तर परळीतून धनंजय मुंडे यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. आता आज दुसरी यादी जाहीर झाली आहे.

अदिती तटकरे (श्रीवर्धन), नवाब मलिक (अणुशक्तीनगर), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा), पृथ्वीराज साठे (केज) यांच्या नावांनंतर चंदगडमधून राजेश पाटील, सुलक्षणा शिलावंत -  पिंपरी , बाळासाहेब आजबे  - आष्टी , यशवंत माने - मोहोळ , दीपिका चव्हाण - बागलाण  यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

भाजप-शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या यादीत या बंडखोरांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, पक्षातील निष्ठावंत घराणी व आजी-माजी आमदारांना उमेदवारी देत राष्ट्रवादीने नवे वाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक तरुण व नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने त्यांनी भाजप व शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com