तुपे, टिंगरे, दोडके, कदम पुण्यात राष्ट्रवादीचे फ्रेश चेहरे; ज्येष्ठांना तिकिट नाकारले 

तुपे, टिंगरे, दोडके, कदम पुण्यात राष्ट्रवादीचे फ्रेश चेहरे; ज्येष्ठांना तिकिट नाकारले 

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी बुधवारी रात्री जाहीर केली असून, त्यात पुण्यातील चार मतदारसंघांचा समावेश आहे. हडपसरमधून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, पर्वतीतून नगरसेविका अश्‍विनी कदम यांना, तर खडकवासल्यातून नगरसेवक सचिन दोडके आणि वडगाव शेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे यांना संधी देण्यात आली आहे.

या यादीत ज्येष्ठ नेत्यांना नाकारण्यात आले आहे. त्यामुळे हे नवे चेहरे पक्षाचे पुण्यातील अस्तित्त्व टिकवण्यात यशस्वी होणार का, याची उत्सुकता आहे.

हडपसरमधून दोन माजी महापौरांसह काही नगरसेवक इच्छुक होते, तरी तुपे यांनी उमेदवारी मागितली नसतानाही पक्षाने त्यांना रिंगणात उतरविले आहे.

याआधी 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही तुपे यांनी हडपसरमधून नशीब अजमाविले होते. तर, पर्वतीतील उमेदवार कदम या तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. वडगाव शेरीचे उमेदवार टिंगरे यांनी 2014 मध्ये शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीत आले. महापालिकेच्या दोन निवडणुकांत दोडके हे निवडून आले आहेत. दरम्यान, कोथरूडची जागा मित्रपक्षाकडे आहे, असे अजित पवार यांनी आधीच सांगितले होते.

पर्वतीचा वाद संपला

आघाडीच्या जागावाटपात पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असताना कॉंग्रेसनेही या मतदारसंघावर दावा केला होता. त्यावरून दोन्ही कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच होती. मात्र, आता राष्ट्रवादीने बाजी मारली असून, या मतदारसंघातून कदम यांना संधी देण्यात आली आहे. कॉंग्रेसकडून नगरसेवक आबा बागूल यांनी फिल्डिंग लावली होती.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com