राष्ट्रवादीने आजच्या बैठकीत इंदापूरचा विषयही घेतला नाही...

इंदापूर विधानसभा मतदारसंघ काॅंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनासोडायचा की नाही, यावरून राजकारण तापलले असताना राष्ट्रवादीने आजच्या बैठकीत यावर मात्र चर्चा केली नाही.
राष्ट्रवादीने आजच्या बैठकीत इंदापूरचा विषयही घेतला नाही...

पुणे : इंदापूर विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्याबाबत आजच्या बैठकीत कोणतीच चर्चा झाली नाही. आमच्या चर्चेत तो विषय नव्हता. इंदापूरबाबत आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते कॉंग्रेसच्या नेत्यांबाबत बोलून योग्य तो निर्णय घेतील. मात्र, त्याआधीच हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीबाबत मांडलेली भूमिका दुर्देवी आहे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यात बोलताना व्यक्त केले.

पक्षाकडे 813 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. आजच्या बैठकीत छाननी समितीने या सर्व अर्जांवर विचार केला. ज्या ठिकाणी एक किंवा दोनच इच्छुक आहेत. त्या ठिकाणी कोणतीही अडचण नाही. अशा ठिकाणच्या उमेदवारांनी निवडणुकीचे कामदेखील सुरू केल्याचे पाटील यांनी सांगितले.

या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार आदी नेते उपस्थित होते.

जागा वाटपाबाबत कॉंग्रेसशी 220 जागांवर एकमत झाले आहे. यापैकी काही जागांबाबत अदलाबदल होऊ शकते. उर्वरित जागांबाबत येत्या चार दिवसात अंतीम निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. माध्यमांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऑडीट करण्यात येत आहे. राष्ट्रवादीतील नेत्यांबाबत बातम्या देण्यात येत आहेत.

जे पक्ष सोडून जाणार नाहीत त्यांची नावेदेखील घेतली जात आहेत. उदयनराजे अद्यापही राष्ट्रवादीत आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील अद्यापही राष्ट्रवादीत आहेत. त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला नाही, असे पाटील यांनी सांगितले.

राज्य सहकारी बॅंकेत घोटाळा झाला असा ढोल बडवण्यात येत आहे. त्यात अजित पवार यांचेच नाव सातत्याने घेण्यात येते. मात्र, अजित पवार यांच्यासोबत असणाऱ्या इतरांची नावे घेतली जात नाहीत. विशेष म्हणजे यातील बहुतांश नावे भाजपा नेत्यांची आहेत, असा दावा पाटील यांनी केला.

राष्ट्रवादीतून भाजपात जाणारे नेते कशासाठी भाजपात जात आहेत, याची कल्पना मतदारांना आहे. कितीही नेते गेले तरी आमच्या पक्षात सक्षम उमेदवारांची कमी नाही. अनेक इच्छुक पक्षात आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com