`राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी करणाऱ्या फेसबुक पेजवर कारवाईची मागणी`

`राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी करणाऱ्या फेसबुक पेजवर कारवाईची मागणी`

पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी करत असल्याने आघाडीबिघाडी हे फेसबुक पेज बंद करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसने आज पुणे पोलिसांकडे केली.

याबाबत पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण आणि महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने पोलिसांना निवेदन दिले.

`आघाडी-बिघाडी या फेसबुक पेजच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष  शरद पवार, अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे यांच्यावर टीका केली जात आहे.  तसेच समाजद्वेष पसरविला जात आहे. असे करणाऱ्या  भक्तांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.आणि लवकरात लवकर हे पेज बंद करावे, असे निवेदन पोलिस आयुक्त डॉ.व्यकटेशम् यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी शहराध्यक्ष चेतन तुपे, गौरव जाचक, स्वप्निल थोरात उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com