NCP Declres Names of Eleven Candidates | Sarkarnama

राष्ट्रवादीचे अकरा उमेदवार जाहीर; हातकणंगलेची जागा स्वाभिमानीला

संजय मिस्कीन
गुरुवार, 14 मार्च 2019

राष्ट्रवादी काँग्रेसने काही वेळापूर्वी आपल्या अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत सुप्रिया सुळे, उदयनराजें, धनंजय महाडिक, सुनील तटकरे यांचा  समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज सकाळपासून मुंबईत बैठक सुरु आहे. हातकणंगलेची जागा स्वाभिमानीला सोडण्यात आली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने काही वेळापूर्वी आपल्या अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत सुप्रिया सुळे, उदयनराजें, धनंजय महाडिक, सुनील तटकरे यांचा  समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज सकाळपासून मुंबईत बैठक सुरु आहे. हातकणंगलेची जागा स्वाभिमानीला सोडण्यात आली आहे. बुलडाण्याच्या जागेवर मात्र राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला आहे.

लोकसभा निवडणुकांना आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. आज सकाळपासून विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरु आहे. या बैठकीच्या उत्तरार्धात पहिली अकरा नावे निश्चित करण्यात आली आहेत. या पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नांव मात्र नाही. आज सायंकाळपर्यंत आणखी काही नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानीने बुलडाण्याच्या जागेवर दावा केला होता. पण या ठिकाणी राष्ट्रवादीने राजेंद्र शिंगणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.  

राष्ट्रवादीचे जाहीर उमेदवार
परभणी - राजेश विटेकर

जळगांव - गुलाबराव देवकर

बुलडाणा - राजेंद्र शिंगणे

सातारा - उदयनराजे भोसले

ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील

बारामती - सुप्रिया सुळे

रायगड - सुनिल तटकरे

कोल्हापूर - धनंजय महाडिक

ठाणे - आनंद परांजपे

कल्याण - बाबाजी बाळाराम पाटील

लक्षद्विप - मोहम्मद फैजल

हातकणंगले - स्वाभिमानी ला पाठिंबा.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख