ncp declarers 5 candidate for loksabha election | Sarkarnama

मावळमधून पार्थ, शिरूरमधून कोल्हे, नाशिकमधून समीर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 15 मार्च 2019

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात आली. त्यात मावळमधून पार्थ अजित पवार, नाशिकमधून समीर भुजबळ, शिरूरमधून अमोल कोल्हे, बीडमधून बजरंग सोनवणे, दिंडोरीमधून धनराज महाले यांचा समावेश आहे.

पक्षाच्या काल झालेल्या उमेदवारांच्या यादीत पार्थ यांचे नाव नव्हते. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. आज त्यांचे नाव जाहीर झाल्याने आता त्यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

शिरूरमधून कोल्हे यांच्या नावाची चर्चा होतीच. त्यासाठीच त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे येथे आता शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व त्यांच्यात सामना होईल. हा सामना आतापासूनच रंगतदार झालेला आहे.

नाशिकमध्ये समीर भुजबळ यांचे नाव अखेर मान्य झाले. येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उभे राहावे, असा आग्रह पक्षश्रेष्ठींचा होता. मात्र समीर यांच्या नावाचा हट्ट छगन भुजबळ यांनी धरला होता. तो पक्षाने मान्य केल्याचे दिसून येत आहे.

बीडमध्ये जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य बजरंग सोनवणे यांना पक्षाने संधी दिली आहे. येथे भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात पक्ष ताकदवान उमेदवार देईल, अशी अपेक्षा होती. मात्र सोनवणे यांना येथे उतरविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दिंडोरी येथून माजी आमदार धनराज महाले यांना पक्षाने उतरविले आहे. त्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेथे आता भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याविरोधात त्यांची लढत होण्याची चिन्हे आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख