लातुरात राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक `वंचित`मध्ये

latur-maniyar.
latur-maniyar.

लातूर: राज्याचे माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांचे समर्थक व महापालिकेतील एकमेव नगरसेवक राजा मणियार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला.

लातूर शहरविधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छिणारे श्री. मणियार यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.  इतकेच नव्हे तर त्यांनी वंचित बहुजन
आघाडीकडे लातूर शहर विधानसभा मतदार संघातून उमेदवारीचीही मागणी केली आहे. महापालिकेत एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक श्री. मणियार आहेत.

 माजीमंत्री पद्मसिंह पाटील आणि राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांचे ते समर्थक मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून श्री. मणियार हे राष्ट्रवादी
काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते राहिले आहेत. गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत श्री. मणियार हे  निवडून  आले.  

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला लातूरमध्ये
चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावेळेसपासूनच श्री. मणियार हे वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात होते. ते लातूर शहरातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चाही केली जात आहे. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी त्यांनी पक्षात
प्रवेश केला. त्यांचे  पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य
अण्णाराव पाटील, अशोक सोनोने, रेखा ठाकूर यांनी स्वागत केले. श्री. मणियार यांनी पक्षात प्रवेश करीत ही मुलाखत दिली आहे.

लातूर शहर विधानसभामतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागितली आहे. गेल्या वीस वर्षापासून ते नगरसेवक आहेत. मुस्लिम व मागासवर्गीय समाजात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.

मी कोणावरही नाराज नाही
गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी काम केले आहे. मी कोणावरही नाराज नाही. वंचित बहुजन आघाडीत न्याय मिळेल या अपेक्षेने आपण प्रवेश करून लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली आहे. ती
मिळाली तर चांगलेच आहे नाही मिळाली तरी पक्षाचे काम करणार आहे.
-राजा मणियार, नगरसेवक.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com