`शिवतारेंच्या डरकाळ्या फोल ठरणार; पुरंदरमध्ये घड्याळच आघाडी घेणार`

`शिवतारेंच्या डरकाळ्या फोल ठरणार; पुरंदरमध्ये घड्याळच आघाडी घेणार`

सासवड ः बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप - शिवसेना व महायुतीने कितीही डरकाळ्या फोडल्या असल्या तरी `परिवर्तन` होणार नाही. राज्यमंत्रीपदाची युतीकडे ताकत असली तरी एकट्या पुरंदर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना 25,000 ते 35,000 चे मताधिक्य मिळेल,`` असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.  
 
माजी सनदी अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय झालेले नव्या दमाचे नेते संभाजी झेंडे म्हणाले, ``सुप्रिया सुळे निवडुन येणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे. मागील वेळी लोकसभा निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदार संघात  सुळे यांना थोडे पिछाडीवर राहीला लागले होते. त्यावेळी मोदी लाट होती. काॅंग्रेस, मनसे पूर्णतः विरोधात होते. विरोधी उमेदवार महादेव जानकर यांनी विशिष्ट समाजाची बरीच मते घेतली होती. त्यातून विधानसभा मतदार संघांतर्गत पुरंदर तालुक्यात सुळे यांना 1,400 मताधिक्य मिळाले होते. तर खाली हवेली तालुक्याच्या भागात 7,500 ने सुळे मागे राहील्या होत्या. एकुण विधानसभा मतदार संघांत 6,000 मतांनी सुळे यांना मागे राहावे लागले होते.

``आता मोदी लाट विरुन गेली. धनगर आरक्षण मिळाले नाही. शेतकरी मोदींवर नाराज आहे. सुळे यांनी दोन वर्षात हवेलीत लक्ष घातले. 2017 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत तिथे मते वाढली. हवेलीत 8 पैकी 6 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. पुरंदरमध्ये जिल्हा परीषद निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून 30,000 च्या आसपास मते मिळाली.  शिवसेनेला 37,000 मते मिळाली. जेजुरी व सासवड पालिका मित्रपक्ष काँग्रेसकडे आल्या. मागिल निवडणुकीपेक्षा आता खुप बदल झाला आहे,``असा दावा झेंडे यांनी केला.
 
जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार जगताप प्रतिक्रीया देताना म्हणाले, ``लोकसभा निकाल अपेक्षित, फक्त सुप्रियाताईंच्या मताधिक्याचा प्रश्न आहे. पुरंदरला तर सुप्रियाताईंना 32,000 ते 35,000 चे मताधिक्य मिळावे, ही अपेक्षा आहे. त्यापेक्षा अधिक मिळाले तर तो बोनसच ठरेल. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजकीय परिस्थिती वेगळी होती. आमचे नेते संजय जगताप तटस्थ होते. यावेळी मात्र संजय जगताप यांनी ताकतीने आघाडीचे व  सुळे यांचेच काम करणार असे दोन महिने अगोदरच जाहीर केले होते. त्या पध्दतीने यंत्रणा राबविली. प्रतिसादही मिळाला. राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुरंदरमध्ये थोडी अधिक मेहनत घेत प्रचार केला, असे म्हंटले तरी वावगे होणार नाही. दोन्ही काँग्रेस एकत्रित व शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षाचे सहकार्य मिळाले. पवारसाहेबांची कन्या, खासदार म्हणून केलेली विकास कामे, लोकसभेतील कामगिरी, जनसंपर्क  सुळेंना उपयोगीच पडला.``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com