आजच्या निकालाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान झाला : शरद पवार

हा निकाल योगायोगाने संविधान_दिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया
NCP Leader Sharad Pawar Welcomes Supreme Court Decision About Maharashtra
NCP Leader Sharad Pawar Welcomes Supreme Court Decision About Maharashtra

मुंबई : राज्यघटनेतील तत्वे व लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार! हा निकाल योगायोगाने संविधान_दिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा  आनंद आहे," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात २७ तारखेला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हे बहुमत आम्ही विधानसभेत निश्चित सिद्ध करु, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली आहे.

लोकशाही मूल्ये जतन करत २४ तासात खुले मतदान घेत बहुमत दाखविण्याचे आदेश माननिय सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. भाजपचे लोकशाहीस घातक धोरण लक्षात घेता थेट प्रक्षेपण करण्यास सांगून भाजपच्या घटनाविरोधी प्रवृत्तीला सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने चाप लावला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयाने भारताच्या राज्य घटनेचे संरक्षण करणारा निर्णय दिला आहे. भाजपची सत्तेची हाव आता संपेल. या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com