जिल्हा परिषदेला तब्ब्ल 7600 मतांची आघाडी घेत सागर  पाटील विजयी  - NCP Chandrakant Patil wins by huge margin | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा परिषदेला तब्ब्ल 7600 मतांची आघाडी घेत सागर  पाटील विजयी 

संपत मोरे
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

चंद्रकांत बापू पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकांत पाटील यांचे सुपूत्र सागर चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती.

पुणे-सांगली जिल्ह्यातील सावळज जिल्हा परिषद मतदारसंघाच्या झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सागर चंद्रकांत पाटील यांचा दणदणीत विजय झाला.

चंद्रकांत बापू पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकांत पाटील यांचे सुपूत्र सागर चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती.ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती .

या निवडणुकीत  इतर कोणत्याही पक्षाने उमेदवार दिला नव्हता मात्र विक्रांतसिंह पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध झाली नाही.या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र  रोहित पाटील यांनी अग्रभागी राहून प्रचारयंत्रणा सांभाळली.जोरदार सभा घेतल्या.

या निवडणुकीत इतर पक्षाच्या कोणत्याही नेत्याने फारसे लक्ष घातले नाही.सागर पाटील यांना 8407 तर अपक्ष उमेदवार विक्रांतसिंह पाटील यांना837 मते मिळाली.नोटाला 133 मते मिळाली.सावळज हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो तो राखण्यात राष्ट्रवादी ला यश मिळाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख