ncp challenge bjp in pimpri chinchvad help of independ candidate | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपपुढे अपक्षांचे खरे आव्हान 

उत्तम कुटे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पिंपरीः उद्योगनगरीतील तिन्ही जागा महायुती,तर फक्त एकच आघाडी म्हणजे राष्ट्रवादी लढवित आहे.दोन ठिकाणी अपक्ष रिंगणात आहे. तेथील भाजप उमेदवारांसमोर खऱे आव्हान हे राष्ट्रवादीने निर्माण केले आहेत. कारण दोन्ही अपक्षांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.त्यामुळे शहरातील पिंपरीच्या आघाडी विरुद्ध युती या लढतीऐवजी भोसरी व चिंचवडच्या भाजप विरुद्ध अपक्ष याच लढतींची चर्चा आहे. 

उद्योगनगरी हा एकेकाळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आता ढासळला आहे. त्यांचा एकही आमदार नाही.महापालिकेतील सत्ताही गेली आहे. त्यामुळे पालिकेसह विधानसभेचे गतवैभव परत मिळवण्यासाठी यावेळी शहराचे त्यावेळचे दादा अजित पवार यांनी यावेळी मोठी चाल केली आहे. चिंचवडमध्ये त्यांनी काट्यानेच काटा काढायचे ठरवले आहे.तेथे त्यांनी भाजप उमेदवाराविरुद्ध शिवसेना बंडखोर राहूल कलाटेंना बळ दिले आहे. 

एवढेच नाही,तर तेथे आपला उमेदवारही न देण्याची खेळी केली आहे.त्यामुळे तेथील लढत राज्यात लक्षवेधी झाली आहे. कारण भाजप उमेदवाराची हॅटट्रिक चुकविण्याची संधीही यानिमित्ताने चालून आली आहे.एवढेच नाही,तर भाजप उमेदवाराचे मंत्री बनण्याचे मनसुबेही त्यातून उधळले जाणार आहे.हॅटट्रिक झाली,तर यावेळी मंत्री बनणार,अशी भाजप उमेदवाराला आशा आहे. 

दुसरीकडे, भोसरीतही नात्यागोत्यातील आजी,माजी आमदारांत लक्षवेधी लढत होत आहे. तेथील प्रतिस्पर्धी हे मामा व भाचे जावई आहेत. भाजप उमेदवार महेशदादा लांडगे हे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार व भोसरीचे पहिले आमदार विलास लांडे यांचे भाचे जावई आहेत.गतवेळीही हे दोघे रिंगणात होते. त्यावेळी अपक्ष महेशदादांनी बाजी मारली होती. यावेळी या दोघांतच निकराचा सामना होत आहे. कारण लांडे यांना राष्ट्रवादीने स्वीकृत केले आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख