राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांसाठी भाजपचे हिरे, शिवसेनेचे कदम आंदोलन करणार

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर सत्ताधारी पक्षाकडून अन्याय केला जातो, अशी एकमुखी तक्रार आज भुजबळ समर्थकांच्या मेळाव्यात करण्यात आली. त्यासाठी आजपासून गावपातळीपासून समर्थकांचे संघटन केले जाईल, असे ठरविण्यात आले. यावेळी नाशिकच्या आमदारांनी भुजबळांना जाहीरपणे समर्थन दिले. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपचे अपूर्व हिरे, शिवसेनेचे अनिल कदम यांसह विविध आमदार विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतील, असे यावेळी जाहीर करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांसाठी भाजपचे हिरे, शिवसेनेचे कदम आंदोलन करणार

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर सत्ताधारी पक्षाकडून अन्याय केला जातो, अशी एकमुखी तक्रार आज भुजबळ समर्थकांच्या मेळाव्यात करण्यात आली. त्यासाठी आजपासून गावपातळीपासून समर्थकांचे संघटन केले जाईल, असे ठरविण्यात आले. यावेळी नाशिकच्या आमदारांनी भुजबळांना जाहीरपणे समर्थन दिले. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपचे अपूर्व हिरे, शिवसेनेचे अनिल कदम यांसह विविध आमदार विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतील, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर 'इडी' ने कारवाई केली आहे. गेली बावीस महिने ते तुरुंगात आहेत. या कायद्यातील कलम 45 हे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. जामीन मिळणे हा प्रत्येकाचा नैसर्गिक अधिकरा आहे. मात्र सत्ताधारी पक्ष ओबीसी समाज व समाजाच्या नेत्यांना हेतुपुर्वक त्रास देण्यासाठी त्यांना जाणीवपूर्वक जामीन मिळु नये असे प्रयत्न करीत असल्याचा आरोप बहुतांश नेत्यांनी मेळाव्यात केला. यावेळी विविध वक्‍त्यांनी सरकारचा निषेध केला.

'भुजबळांच्या प्रश्‍नावर लक्ष वेधण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधीमंडळ पायऱ्यांवर आंदोलन केले जाईल. यादरम्यान भुजबळ समर्थकांचा मोर्चा काढण्यात येईल. त्यामुळे या न्यायप्रविष्ठ विषयावर सभागृहात चर्चा उपस्थित केली जाईल. यासंदर्भात आजपासून गावपातळीवरुन समित्यांची स्थापना केली जाईल. त्याचे काम लगेचच सुरु करण्यात येईल,' असे मुद्दे मेळाव्यात ठरविण्यात आले. त्यामुळे राज्यभरातील भुजबळ समर्थक संघटीत होणार असल्याने भविष्यातील आंदोलनाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी आमदार सर्वश्री अपूर्व हिरे (भाजप), अनिल कदम (शिवसेना), जयंत जाधव, नरहरी झीरवळ (राष्ट्रवादी काँग्रेस) यांसह आमदार दीपिका चव्हाण यांचे पती माजी आमदार संजय चव्हाण, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार दिलीप बनकर, अनिल आहेर, प्रेरणा बलकवडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल बागूल, अद्वय हिरे, समता परिषदेचे नेते डॉ. कैलास कमोद, दिलीप खैरे, नगरसेवक गजानन शेलार, गुरमितसिंग बग्गा, जयदत्त होळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अॅड. रवींद्र खैरे यांसह विविध नेत्यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी विविध भागातुन हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

छगन भुजबळ यांना जामीन मिळाला पाहिजे अशी सर्व भुजबळ समर्थक नेते, कार्यकर्त्यांची भावना आहे. मी त्याच्याशी सहमत असुन यासंदर्भात जो निर्णय होईल त्यात माझा सक्रीय सहभाग राहील - आमदार अनिल कदम, शिवसेना.

छगन भुजबळ यांना राज्यभरातील आमदार पाठिंबा देतील असे चित्र आहे. यासंदर्भात त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन करुन त्याकडे सरकारचे लक्ष वेधू - आमदार डाॅ. अपूर्व हिरे, भाजप.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com