केवढा हा आत्मविश्वास! : निकालाच्या आधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे विजयाचे बॅनर!

केवढा हा आत्मविश्वास! : निकालाच्या आधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे विजयाचे बॅनर!

पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल यायच्या आधीच खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात दोडके समर्थकांच्या या विश्वासाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

येथे भाजपचे भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादीचे दोडके यांच्यात सरळ लढत झाली. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे. मात्र पक्षाचे नेते एकमेकांचे पाय ओढत असल्याने येथे विजय मिळत नसल्याची चर्चा नेहमीच होते. मात्र दोडके समर्थकांना यावर मात केल्याचा विश्वास असून त्यांनी निकालाच्या आधीच जल्लोषाची तयारी केली आहे.

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून 50 हजाराहून अधिक मतांनी पिछाडीवर होत्या. या पार्श्वभूमीवर दोडके समर्थकांचे विजयाचे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com