आमदार भोसलेंच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचा `मंगल`मय नेताही पोलिसांच्या रडारवर

...
anil bhosale shivajinagar bank scam
anil bhosale shivajinagar bank scam

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या गैरव्यवहार  प्रकरणात आणखी काही बडे मासे पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चार संशयितांना येथील न्यायालयाने  १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या बड्या नेत्यांची नावे पुढे येण्याची चिन्हे आहेत. 

भोसले व अन्य चार जणांना पुणे पोलिसांनी काल रात्री अटक केली होती. भोसले यांना घरचा डबा देण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे. 

अनिल भोसले यांच्यासह  संचालक मंडळाने 71 कोटी 86 लाख रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी एस. एस. गोसावी यांच्यासमोर सुनावणी झाली. विशेष न्यायालयात सुनावणी सुरू असताना बँकेच्या ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे रिझर्व्ह बँकने २०१८-१९चे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बँकेचे ऑडिट केले असता ७१ कोटी ७८ लाख रुपये कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये अनिल भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते आदी पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज भोसले यांच्यासह अन्य संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. 

पोलिसांनी या प्रकरणातील सर्व कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच तपास कार्यात पोलिसांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केली होती. तर, बँकेच्या मुख्य कार्यालयात ही रक्कम जमा केल्याच्या बनावट नोंदी केल्या आहेत. ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे. या बाबीचा तपास करण्याची गरज असल्यामुळे पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

या प्रकरणाचा पाठपुरावा सहकार खाते, पोलिस यांच्याकडे करणारे सुधीर आल्हाट यांनी याबाबत राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचे नाव घेतले आहे. शिरूरमधील राजकारणात धांदल उडवून देणाऱ्या या मंगलमयी नेत्याने मित्रांच्या व नेत्यांच्या नावाने या बॅंकेकडून कोट्यवधी रूपयांचे कर्ज काढले. ही बॅंक बुडण्यास हाच नेता कारणीभूत ठरल्याचे त्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिस आता या नेत्याला कधी अटक करणार, असा प्रश्नही आल्हाट यांनी विचारला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com