ncp baramati to stall cm yatra in baramati | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या यात्रेविरोधात राष्ट्रवादीचा बारामतीत गनिमी कावा

मिलिंद संगई
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

बारामती शहर : फडणवीस सरकारला  गेल्या पाच वर्षात विविध पातळ्यांवर आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी (ता. 14) मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. किशोर मासाळ, बापूराव सोलनकर यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी मुख्यमंत्र्यासमोर आंदोलन करणार आहेत.

वाढती बेरोजगारी, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, शेतक-यांची कर्जमाफी अशा अनेक विषयांवर सरकारला गेल्या पाच वर्षात अपयश आले असून याची जबाबादारी मुख्यमंत्र्यांची आहे, त्यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बारामतीत आंदोलन करणार आहेत.

आंदोलनाचे नेमके ठिकाणी जरी नमूद करण्यात आले नसले तरी पोलिस स्थानबध्द करतील या शंकेमुळे राष्ट्रवादी अचानकच आंदोलन करणार असल्याची माहिती मिळत आहे. महाजनादेश यात्रा काढण्यापेक्षाही लोकांचे प्रश्न सोडविण्यास मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य द्यायला हवे होते, अशीही अपेक्षा राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात आली आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख