यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला वंदन करुन राष्ट्रवादी करणार भाजपवर हल्लाबोल! 

यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला वंदन करुन राष्ट्रवादी करणार भाजपवर हल्लाबोल! 

सातारा : गेल्या तीन वर्षात केंद्र व राज्यातील भाजप, शिवसेना युतीच्या सरकार सर्व पातळीवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या बोलघेवड्या व कृतीशून्य सरकारच्या विरोधात जनतेत जागृती करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे हल्लबोल आंदोलन हाती घेतले आहे. या आंदोलनाची सुरवात येत्या शनिवारी (ता. 25) सकाळी आठ वाजता यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळाला वंदन करून सुरू केले जाणार आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत समाधी स्थळ ते कऱ्हाड प्रांत कार्यालय असा मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलनाची सुरवात होणार आहे. 

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली. यामध्ये सरसकट कर्जमुक्तीची घोषणा केली. मात्र, ही घोषणा फसवी निघाली आहे. सोयाबीन, तुर, घेवड्यासह कडधान्याला आधारभूत किंमत अधिक पाचशे रूपये बोनस द्यावा. परतीच्या पावसात नुकसानी झालेल्यांना भरपाई मिळावी. त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदूमीलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकाबाबत तीन वर्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. साताऱ्याचे मेडिकल कॉलेज एका महिन्यात काम सुरू करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यावरही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. कायदा व पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर राहिलेली नाही. उलट राजकिय व्देषातून राजकिय नेत्यांवर मोका सारखे गुन्हे दाखल केले जात असून नेत्यांची राजकिय कारकिर्द संपविण्याचा कट हे सरकार करत आहे. सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन पूर्ण झालेले नाही. ही सर्व स्वप्ने दाखविली ती पूर्ण करावीत. या स्वप्नांची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी हे हल्लोबोल आंदोलन करत आहे, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com