मदन येरावार यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आंदोलन

मदन येरावार यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आंदोलन

पुणे : यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करावे, यासाठी दबाव आणणारे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्यमंत्री मदन येरावार यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी कांग्रेसने आज पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेसमोर आंदोलन केले. 

सहगल यांना बोलावू नये अन्यथा संमेलनाच्या आर्थिक नाड्या आवळण्याची धमकीही येरवार यांनी दिली होती असा खळबळजनक आरोप साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केला आहे. या पार्श्व भूमीवर हे आंदोलन करण्यात आले. 

साहित्य संमेलनात होणाऱ्या भाजपच्या हस्तक्षेपाचा यावेळी निषेध करण्यात आला. पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे-पाटील, प्रदीप देशमुख, मनाली भिलारे, विनोद पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com