ncp and udayanraje bhosale | Sarkarnama

उदयनराजेंचा स्थानिक नेत्यांबरोबरचा संवाद वाढला, राष्ट्रवादीत अस्वस्थता

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 डिसेंबर 2018

सातारा : पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांत आशावाद निर्माण झाला आहे. आगामी काळात महाराष्ट्रातही हाच "ट्रेंड' येईल असे गृहित धरून सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संपर्क मोहिमेवर भर दिला आहे. प्रत्येक तालुक्‍यात विकासकामांच्या निमित्ताने सर्व पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क वाढवू लागले आहेत. उदयनराजेंची ही संपर्क मोहीम राष्ट्रवादी कॉंग्रेसवर दबाव वाढविण्यासाठी नाही ना, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्‍यता आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीतील निकाल पाहता, भाजप "बॅक फुट'वर आले आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात हाच "ट्रेंड' कायम राहण्याची शक्‍यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीला अच्छे दिन... दिसू लागलेले आहेत. आगामी काळात राजकारणाचा बदलता "ट्रेंड' लक्षात घेऊन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संपर्क मोहीम सुरू केली आहे. 

विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सुरू असलेल्या त्यांच्या या संपर्क मोहिमेतून ते भाजपच्या स्थानिक नेत्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे ही संपर्क मोहीम "राष्ट्रवादी'वर दबाव वाढविण्यासाठी नाही ना, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. "राष्ट्रवादी'च्या नेत्यांसोबतच्या वादाकडे दुर्लक्ष करून उदयनराजेंनी आता मतदारसंघातील स्थानिक नेत्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. यातही ते स्थानिक नेतृत्वावर टीकाही करत आहेत. 

फलटण तालुक्‍यातील दौऱ्यात माजी आमदार (कै.) चिमणराव कदम यांच्या स्मृतिदिनास उपस्थित राहून त्यांनी फलटणमध्ये थेट सत्ताबदल कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित करून सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांवर अप्रत्यक्ष टीका केली, तर जावळीतील दौऱ्यात त्यांनी बोंडारवाडी धरणाच्या सर्वेक्षणाच्या कामाच्या पाहणीवेळी त्यांनी या योजनेच्या कामात कोणी राजकारण करू नये, अशी टीका करून स्थानिक भाजप नेत्यांवर सरसंधान साधले आहे. 

या कार्यक्रमास उदयनराजेंसोबत माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते सदाशिव सपकाळ, भाजपचे नेते अमित कदम उपस्थित होते, तर फलटणच्या कार्यक्रमाला (कै.) चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम, राष्ट्रवादीचे नेते सुभाषराव शिंदे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी कोरेगाव आणि कऱ्हाडाचाही दौरा केला. एकूणच साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मतदारसंघात केलेली ही संपर्क मोहीम राष्ट्रवादीच्या नेत्यांना अस्वस्थ करणारी आहे. यातूनच लोकसभा निवडणुकीची चाहूल लागू लागली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख