"घोडगंगा'च्या 21 पैकी पाहिला संचालक शिवसेनेत डेरेदाखल ! राष्ट्रवादीचे आऊटगोईंग आता सहकारातही..

"घोडगंगा'च्या 21 पैकी पाहिला संचालक शिवसेनेत डेरेदाखल ! राष्ट्रवादीचे आऊटगोईंग आता सहकारातही..

शिक्रापूर : गेल्या सहा महिन्यांपासून घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील कारभाराबद्दल जाहीर टीका करून बंडाचे निशाण फडकावलेले राष्ट्रवादीचे संचालक सुधीर फराटे हे आज अखेर "मातोश्री'वर दाखल झाले आणि शिवबंधनात अडकले. पक्षप्रवेशावेळीही त्यांनी पुन्हा एकदा "घोडगंगा' ची 5 एकर जमिन अध्यक्षांनी बळकावल्याची गरळ ओकली खरी पण या पक्षप्रवेशाने कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार ऍड.अशोक पवार व खासदार शिवाजीराव आढळराव यांचा एकमेकांना "राजकीय-सॉफ्टकॉर्नर' नसण्याला मात्र पुष्टी मिळाली. 

कारखान्याच्या 21 पैकी 21 अशी 4 वर्षापूर्वी घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर एकहाती राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता प्रस्थापित केलेले माजी आमदार अशोक पवार यांच्या विरोधात एकही संचालक ब्र काढीत नाही ही शिरूरच्या राजकारणाची वस्तुस्थिती. मात्र या पार्श्‍वभूमीवर 6 महिन्यांपूर्वी संचालक सुधीर फराटे यांनी कारखान्यात प्रचंड गैरव्यवहार सुरू आहे, एक भूखंड अध्यक्षांनी बळकावल्याचे जाहीर आरोप करून तालुक्‍याचे राजकारण हालविले. या स्थितीत फराटे भाजपात जाणार असल्याच्या चर्चाही होत्या. आज मात्र ते मातोश्रीवर पोहचले व शिवबंधनात अडकले. 
जिल्हाप्रमुख माऊली कटके यांच्या पुढाकाराने झालेल्या या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे हवेलीतील काही पदाधिकारी आणि मांडवगण सोसायटीचे संचालक रावसाहेब जगताप, ग्रामपंचायत सदस्य अशोक जगताप, मच्छिंद्र जाधव, आप्पासाहेब फराटे, कृष्णराव फराटे, सामिर फराटे, निलेश इथापे, कैलास फराटे, रत्नाकर फराटे आदींसह 13 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. 
आंबेगाव-शिरूरचे क्रॉस कनेक्‍शन उध्वस्थ ! 
पवार-आढळराव आणि वळसे-पाचर्णे असे "राजकीय सॉफ्टकॉर्नर कनेक्‍शन' असल्याची अनेक उदाहरणे शिरूर व आंबेगावात वारंवार निदर्शनास येत. मात्र शिवसेनेने गमावलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघातील जागेने हे एकमेकांचे सॉफ्टकॉर्नर उध्वस्थ झाले असे म्हणण्यास वाव आहे. कारण घोडगंगाचे संचालक सुधीर फराटे आता अशोक पवारांच्या विरोधातील धार तीव्र तर करणारच आणि फराटे यांना पक्षात घेताना आढळरावांनी तसा शब्द त्यांना दिला असणार हे नक्की. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com