राष्ट्रवादीची "संविधान बचाव मोहिम' उद्या पुण्यात

राष्ट्रवादीची "संविधान बचाव मोहिम' उद्या पुण्यात

पुणे : भाजप आणि या पक्षाची मातृत्व संस्था असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देशाच्या घटनेवर आघात करीत असल्याचा आक्षेप घेत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या "संविधान बचाव-देश बचाव' मोहिमेला सोमवारी पुण्यात प्रारंभ होणार असून, या मोहिमेचा मूळ उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार असला तरी, या पक्षाच्या नेत्यांचा खरे लक्ष्य मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राहण्याची शक्‍यता आहे. 

संविधान बचाव मोहिमेत फडणवीस सरकारविरोधात राष्ट्रवादीच्या तोफा धडाडणार का ? याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे मान्यवर नेते मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. दुसरीकडे, राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारच्या सत्तेला पुढील दोन दिवसांत चार वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर फडणवीस सरकारच्या कामांचा हिशेब मागण्याची तयारी विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या गोटात करण्यात आली आहे. त्यात, गेल्या काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना जबरदस्त ओरबाडे काढत असल्याचेही पाहायला मिळाले आहे. त्याचेही पडसाद राष्ट्रवादीच्या "संविधान बचाव' कार्यक्रमात उमटण्याची चिन्हे आहेत. 

भाजपला देशाची घटना मान्य नसल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असून, त्याविरोधात पक्षाने संविधान बचाव मोहीम हाती घेतली आहे. त्यानिमित्ताने राज्यभर मेळाव्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून मोदी सरकारचा कारभार लोकांपुढे मांडण्याचा या पक्षाच्या नेत्यांचा इरादा आहे. आपल्या मोहिमेची व्यापकता वाढविण्याकरिता तिच्या नेतृत्वाची जबाबदारी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविले आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील मेळावा पुण्यातील स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होईल. पवार, पाटील यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, डॉ. फौजिया खान, चित्रा वाघ, वंदना चव्हाण उपस्थित राहणार आहेत. दिल्ली आणि मुंबईतील भाजप सरकारांना सत्तेतून घालण्यासाठी राष्ट्रवादीने रणनीती आखली आहे. त्याचाच भाग म्हणून राज्य सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ सरकारांच्या अकार्यक्षमतेचे भांडवल करीत या पक्षाचे नेते सतत रस्त्यावर उतरत आहेत. मोदी सरकारपेक्षा फडणवीस सरकारवर हा पक्ष अधिक रोष व्यक्त करताना करीत असल्याचे नेत्यांच्या भूमिकांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संविधान बचाव मोहिमेत मुख्यमंत्री फडणवीसांना राष्ट्रवादीचे "टार्गेट' ठरण्याची शक्‍यता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com