नांदेडला अखेर कॉंग्रेस - राष्ट्रवादीने मिळविली सत्ता.... 

Nanded
Nanded

नांदेड: जिल्हा परिषदेची त्रिशंकू अवस्था झाल्यामुळे एकमेकांना सहकार्य करत आघाडी किंवा युती करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे नांदेड जिल्हा परिषद कुणाच्या ताब्यात जाणार आणि कोण कोण एकत्र येणार, या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून पुन्हा एकदा नांदेड जिल्हा परिषदेवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता मिळवली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक यांनी शेवटच्या क्षणी आघाडी करत बाजी मारली. 

कॉंग्रेस आणि खासदार अशोक चव्हाण यांना एकटे ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले त्याचबरोबर राष्ट्रवादीने देखील कमी अधिक प्रमाणात साथ दिली. मात्र जनतेचा कौल आल्यानंतर बहुमत कुणालाच मिळाले नाही आणि त्रिशंकु अवस्था निर्माण झाली त्यामुळे सुरवातीला एकमेकांच्या विरोधात निवडणुक लढविल्यानंतर आता एक येण्याशिवाय पर्यायच शिल्लक नव्हता. पण कुणी एकत्र यायचे हाच प्रश्न होता. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या हातात सत्तेची चावी असल्यामुळे ते ज्यांच्यासोबत जातील त्यांना सत्ता मिळणार होती हे ही तितकेच स्पष्ट होते.

त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून सत्ता मिळविण्यासाठी खलबते सुरू होती. दररोज नाट्यमय घडामोडी घडत होत्या. कुणी कुणाला पाठिंबा द्यावा, यासाठी नांदेडपासून ते अगदी मुंबईला पक्षश्रेष्ठींपर्यत शिष्टमंडळे गेली आणि त्यात अखेर राष्ट्रवादीने कॉंग्रेसला पाठिंबा देण्याचे जाहीर करत कॉंग्रेससोबत आघाडी करत सत्ता काबीज केली. 


सत्ता मिळविण्यासाठी भाजपचे राज्य उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विशेष प्रयत्न केले त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची मदत घेण्याचाही शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला.

त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक तसेच माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजी मंत्री गंगाधरराव कुंटुरकर आदींना सोबत घेत राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक आमदार सतिश चव्हाण यांच्याशी चर्चा करत राष्ट्रवादीला आपलेसे केले आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज केली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com