ncp and bjp problem in nashik | Sarkarnama

पवारांविषयी अपशब्द वापरणाऱ्या देवयानी फरांदे यांच्यावर गुन्हा दाखल करा : प्रेरणा बलकवडे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

या प्रकाराबद्दल महिला आमदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पोलिसांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली. शरद पवार यांच्याबाबत पोलिस स्टेशन परिसरात वापरलेले अपशब्द व घोषणा चुकीच्या असून पोलिसांसमोर हे घडले आहे तरी याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा. राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या बलकवडे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरषोत्तम कडलग, तालुका अध्यक्ष गणेश गायधनी, प्रफुल्ल पावर, महेश शेळके आदींनी ही मागणी केली आहे. 

नाशिक : "जेएनयु' मधील विद्यार्थिनीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला व कार्यकर्त्यांनी शांततेत निदर्शने केली होती. यावेळी अटक केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रोत्साहनाने भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिस ठाण्यात घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी अपशब्द वापरले गेले त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रेरणा बलकवडे यांनी केली आहे. 

यासंदर्भात त्यांनी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह पोलिसांना निवेदन दिले. त्यासोबत कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीचा व्हीडीओ सादर केला. उर्वरीत प्रसंगांचे व्हीडीओ पलिसांनी रेकॉर्ड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक पन्हाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी खोटे कलम लावल्याने त्यांचीही चौकशी व्हावी अशा आशयाचे निवेदन प्रसिध्दीस दिले. शरद पवार उद्या नाशिक दौऱ्यावर येत असल्याने या विषयावरुन राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. 

निवेदनात म्हटले आहे, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नाशिकच्या कार्यालयाबाहेर शांततेच्या मार्गाने "जेएनयु' हल्ल्याचा निषेध केला. त्याठिकाणी मिडीया व साधारण पाच ते सात मिनिटांत पोलिसांचा मोठा फौजफाटा आला. आंदोलनकर्ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकारी व महिलांवर प्रतिबंधक कारवाई म्हणून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी गाडीमध्ये बसवले. यावेळी "अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. हे मीडियाच्या कॅमेऱ्यात टिपले गेले. या घटनोनंतर आमदार देवयानी फरांदे यांनी राजकीय हेतूने पोलीस स्टेशनला आल्या. राष्ट्रवादी "राष्ट्रवादी'चे कार्यकर्ते महिलांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधाचे आंदोलन करीत होते. आमदार फरांदे यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रामणात घोषणाबाजी केली. "अभाविप'च्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालत स्थानिक आमदारांनी दबाव टाकला. पोलिस स्टेशच्या परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी देखील अपशब्द वापरुन घोषणा दिल्या. हे सर्व पोलिस स्टेशनच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे. हे सर्व अयोग्य असुन आम्ही या दबावाला बळी पडणार नाही. 

या प्रकाराबद्दल महिला आमदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पोलिसांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली. शरद पवार यांच्याबाबत पोलिस स्टेशन परिसरात वापरलेले अपशब्द व घोषणा चुकीच्या असून पोलिसांसमोर हे घडले आहे तरी याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा. राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या बलकवडे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरषोत्तम कडलग, तालुका अध्यक्ष गणेश गायधनी, प्रफुल्ल पावर, महेश शेळके आदींनी ही मागणी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख