ncp and bjp in nagpur | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

भाजपचे माजी आमदार घोडमारेंची " घड्याळ ' बांधण्याची तयारी ?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकापाठोपाठ भाजपमध्ये जात असताना उपराजधानीत मात्र गंगा उलटी वाहत असल्याचे आज बघायला मिळाले. भाजपचे हिंगण्याचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेने आज जोर पकडला. एका हॉटेलमध्ये सकाळी विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रमेश बंग यांची भेट घेतली. भेटीतील चर्चेचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. पण विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविण्यासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. 2009 मध्ये घोडमारे भाजपकडून निवडून आले होते. 

पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांना 2014 मध्ये थांबण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यावेळी त्यांना विधानपरिषदेचे आश्‍वासनही देण्यात आल्याची माहिती आहे. कदाचित ते पाळले गेले नाही आणि यावेळी सुद्धा भाजपकडून उमेदवारी मिळण्याची कुठलीही शक्‍यता नाही. त्यामुळे घोडमारेंनी हे पाऊल उचलले असावे, अशी शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा उद्या नागपुरात येणार आहे. काटोल येथील जाहीर सभा आटोपल्यानंतर ही यात्रा नागपुरात प्रवेश करेल. दक्षिण नागपूर आणि पूर्व नागपुरात सभा होणार आहेत. यापैकी एखाद्या सभेत विजय घोडमारे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्‍यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली. 

यासंदर्भात श्री घोडमारे यांच्याशी संपर्क साधला असता, "माझे घर हॉटेल रॅडीसन ब्ल्यूच्या बाजुलाच आहे. दररोजप्रमाणे मी सकाळी फिरायला निघालो होतो. दरम्यान मला जयंत पाटील आणि रमेश बंग भेटले. आमच्यात राजकीय विषयांवर चर्चा रंगली. चार राजकीय लोक भेटले की राजकीय चर्चा होतातच. पण मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. काही घडामोडी असतील तर तुम्हाला नक्की सांगू, असे त्यांनी "सरकारनामा' ला सांगितले. आता येवढे मोठमोठे नेते पक्षांतर करीत आहेत, तर आपणही केले तर वावगे काय, असे सुचक विधानही त्यांनी बोलता-बोलता केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख