`मुख्यमंत्री फडणवीस, तुम्ही परत नागपुरला या'; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनोखे आंदोलन

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुद्धे यांच्या नेतृत्वात आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या परीसरात आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री तुम्ही परत नागपुरला या, असा संदेश देणारे विविध फलक आंदोलनादरम्यान झळकवण्यात आले.
`मुख्यमंत्री फडणवीस, तुम्ही परत नागपुरला या'; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनोखे आंदोलन

नागपूर ः महायुतीला जनतेने कौल दिला. पण 13 दिवस उलटुनही भाजपने, देवेंद्र फडणवीसांनी सरकार स्थापन केले नाही. आज या सरकारची चौदावी आहे, असं आम्ही समजतो. त्यामुळे फडणवीस, तुम्ही सरकार बसवू शकत नाही, तुम्ही
मुख्यमंत्री बनू शकत नाही. म्हणून तुम्ही "बाय बाय मुंबई', अस म्हणत नागपुरला परत या आणि आपल्या मतदारसंघात लक्ष घाला, असे आवाहन करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुद्धे यांच्या नेतृत्वात आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या परीसरात आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री तुम्ही परत नागपुरला या, असा संदेश देणारे विविध फलक आंदोलनादरम्यान झळकवण्यात आले.

राज्यातील मतदारांनी युतीला कौल दिला. युतीला सरकार स्थापन करायचं सोडून "चुहा बिल्ली' चा खेळ सुरू आहे. सरकार स्थापनेसाठी युतीला अपयश येत आहे. असंच भांडण चालत असेल तर राज्य कारभार चालवणे युतीला कठीण होईल. हे
महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. "मी पुन्हा येणार' असं वक्तव्य करणारे
मुख्यमंत्री अपयशी होताना दिसत आहेत. म्हणून मुख्यमंत्री वापस या. "तुम्ही पुन्हा येणार नाही' अशा आशयाचे फलक लाऊन महिलांनी फलकावरील मुख्यमंत्र्यांच्या चित्राचे औक्षवण करत पुष्पमाला घातल्या. "तुम्ही महाराष्ट्रापेक्षा आपला मतदारसंघ सांभाळा. तुमचं स्वागत आहे', अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

बळीराजाला वाचवण्यासाठी, बहुजनाच्या हितासाठी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, तरूणांच्या रोजगारासाठी, महिलांच्या रक्षणासाठी, व्यापार, उद्योग वाचविण्यासाठी, महाराष्ट्र घडवण्यासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवारांच्या पुढाकाराची गरज आहे. त्यामुळे "पवार साहेब कसंही करा
महाराष्ट्राला पुरोगामी सरकार द्या', अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. आंदोलनात अलका कांबळे, ईश्वर बाळबुधे, अविनाश गोतमारे, सतीश इटकेलवार, डॉ विलास मुर्ती, महेंद्र भांगे, मोरेश्वर जाधव, रिजवान अंसारी, रूद्रा धाकडे, जतीन मलकान, अजहर पटेल, गोपाल ठाकुर, मोरेश्वर फटींग, नितीन नायडू, प्रणय जांभुळकर, रेखा गौर, डॉ मीनाक्षी वाडबुधे,
पुष्पा डोंगरे, शोभा भगत, चंद्रकला पाटील, मंदा वैरागडे, नेहा गौर, विजया लालझरे सह नागपूर शहरातील नागरिक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com