ncp | Sarkarnama

सुरेश धस सहा वर्षासाठी निलंबित, क्षीरसागर यांना अभय

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

बीड ः जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मदत करणाऱ्या राष्ट्रवादीचे माजीमंत्री सुरेश धस यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. बीड जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पक्षाचा व्हिप नाकारत धस समर्थक पाच सदस्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान केले होते. धस यांच्या भूमिकेमुळे सर्वाधिक सदस्य असून देखील राष्ट्रवादीला सत्तेवर पाणी सोडावे लागले होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशावरून पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल आपल्यावर सहा वर्ष निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे पत्र राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी आज (ता. 7) सुरेश धस यांना दिले आहे. 

बीड जिल्हा परिषद निवडणुकीत अनपेक्षितपणे भाजपची सत्ता आली. राष्ट्रवादीचे माजीमंत्री सुरेश धस यांनी त्यांच्या पाच समर्थक सदस्यांना भाजपला मदत करण्यास सांगितल्यामुळे राष्ट्रवादीची संधी हुकली. माजीमंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगला या राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. पण धस यांच्या भूमिकेमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. या प्रकारामुळे राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली होती. पक्षाचे नेते अजित पवार यांनी देखील फेसबुकवरून पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कारवाई करणारच असा संदेश दिला होता. पण कारवाईला विलंब होत असल्याने पक्षात नाराजी पसरली होती. प्रकाश सोळंके यांनी तर जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस, अक्षय मुंदडा यांची पक्षातून हकालपट्टी करा, नाही तर मी पक्षातून जातो अशी धमकीच पक्षनेतृत्वाला दिली होती. 
क्षीरसागर व मुंदडा यांच्याबाबत निर्णय कधी ? 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडीच्यावेळी धस समर्थक पाच सदस्यांनी भाजपला उघडपणे मतदान केले. तर जयदत्त क्षीरसागर यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीचा एक सदस्य गैरहजर राहिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी देखील धस, क्षीरसागर व अक्षय मुंदडा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. पक्ष श्रेष्ठीने मात्र केवळ धस यांच्यावर निलंबनाची कारवाई करत जयदत्त क्षीरसागर व मुंदडा यांना अभय दिल्याचे दिसते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख