नवी मुंबई महापालिकेचे धनुष्य शशिकांत शिंदेंच्या खांद्यावर

नवी मुंबई महापालिकेचे धनुष्य शशिकांत शिंदेंच्या खांद्यावर

सातारा : कोरेगावचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद शशिकांत शिंदे यांच्यावर नवी मुंबईत राष्ट्रवादीची पक्ष, संघटनेची बांधणीसोबतच महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सध्या त्यांनी येथील महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील स्थानिक नेत्यांत समन्वय राखत राष्ट्रवादीची बांधणी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय बैठका घेऊन स्थानिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यावर भर दिला आहे.

नवीन मुंबईचे प्रभारी म्हणून खासदार शरद पवार यांनी माजी आमदार शशिकांत शिंदेंवर जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांनी येथे ठाण मांडुन कामास सुरवात केली आहे. त्यांच्यापुढे येथे राष्ट्रवादी पक्षाची नव्याने बांधणी करून पक्षाला महापालिका निवडणुकीसाठी सक्षम करण्याचे काम करावे लागणार आहे.

सध्या ते वॉर्डनिहाय बैठका घेऊन स्थानिक नागरीकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यावर भर देत आहेत. त्यासाठी त्यांना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची साथ मिळत आहे. तसेच पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची साथ मिळत आहे. नेमकी कशा प्रकारे रणनिती त्यांनी आखली आहे, यासंदर्भात त्यांच्याकडून सरकारनामाच्या प्रतिनिधीने जाणून घेतले. 

शशिकांत शिंदे म्हणाले, नवीन मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. त्यामुळे पक्षाची मोठी हानी झाली. आता येथे पुन्हा शुन्यातून पक्ष बांधणी करावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी माझ्यावर नवी मूंबई महापालिकेच्या निवडणुकीची आणि पक्ष बांधणीची जबाबदारी दिली आहे. 

त्यानुसार मी कामास सुरवात केली आहे. सुरवातीला पक्ष बांधणीला प्राधान्य दिले आहे. सध्या 30 ते 40 टक्के पक्ष बांधणी पूर्ण झाली आहे. आता वॉर्डनिहाय संपर्क मोहिम करून तेथील स्थानिक नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. 

तसेच पक्ष संघटना बांधताना कोणत्या ठिकाणी पक्षाला चांगला उमेदवार मिळू शकतो, याची चाचपणी केली जात आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील येथील स्थानिक नेत्यांशी समन्वय साधून काम सुरू आहे. प्रत्यक्ष जागा वाटपाचा फॉर्म्यूला सर्वांना विश्‍वासात घेऊनच होणार आहे.

यामध्ये 40-60 चा फॉर्म्यूला राहण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. नवी मुंबईत राष्ट्रवादीचे गेलेले वैभव पुन्हा मिळविण्यासोबतच महापालिकेत सत्तेत राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडुन आणण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com