nawaj sharif | Sarkarnama

शरीफांना अंधारात ठेवून जाधवना मृत्युदंडाची शिक्षा

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना अंधारात ठेवून भारतीय हवाई दलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे. दरम्यान, भारतीय हेर असल्याच्या संशयावरून पाक व्याप्त काश्‍मिरात आणखी तीनजणांना अटक करण्यात आल्याचेही समजते. 

विशेष म्हणजे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानशी द्वीपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न करू असे सांगताच पाकिस्तान लष्कराने कुलभूषण जाधव यांना मृत्युदंडाची निर्णय जाहीर केला. 
कुलभूषण जाधव प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही शरीफ यांना अंधारात ठेवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे शरीफ यांनी भारताशी संबंध सुधारण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न पाकिस्तानी लष्कराला फारसे रूचलेले नाहीत, असे यातून स्पष्टपणे दिसून येते. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावून शरीफ यांना योग्य तो संदेश दिल्याचीही चर्चा आहे. 

पाक लष्कराने प्रचंड गुप्तता बाळगत जाधव यांच्याविरोधात रावळपिंडीतील लष्करी न्यायालयात कारवाई केली. या कारवाईची माहिती नवाज शरीफ सरकारलाही दिली गेली नाही. औपचारिकता म्हणून नंतर शरीफ यांचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांना पाक लष्कराने कळवले. त्यातही पाक लष्कराने अझीज यांचा वापर शरीफ यांना संदेश पोहोचावा यासाठी केला. 

कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप करून त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारताने पाकशी कुठल्याही पातळीवर चर्चा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकशी अनिश्‍चित काळासाठी सर्व चर्चा रोखण्यात आल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे.  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख