राजमातांच्या विनंतीमुळेच उदयनराजेंना मिळत होते तिकीट!

उदयनराजेंचा राष्ट्रवादी प्रवेश आणि तीनवेळा तिकीट मिळण्यात महत्वाचे योगदान राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे राहिले आहे. उदयनराजेंनी काहीही विधाने केली तरी कल्पनाराजे सातत्याने पवारांच्या संपर्कात राहत आणि उदयनराजेंना त्रास होवू नये, याची काळजी घेत.
राजमातांच्या विनंतीमुळेच उदयनराजेंना मिळत होते तिकीट!

पुणे: सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीतून उदयनराजेंवर टिकेची झोड सुरू आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी उदयनराजेंना राष्ट्रवादीने तिकीट देवू नये, अशी एकमुखी मागणी पक्षाच्या आमदारांनी केली होती. मात्र शरद पवारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून उदयनराजेंना तिकीट दिले. तत्पुर्वीच्या निवडणुकांतही उदयनराजेंविषयी साताऱ्यातील पदाधिकारी अनुकूल नव्हते. तरीही पवारांनी तिकीट देवून खासदार केले, अशी मांडणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात येत आहे.

आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या आमदारांचा विरोध असतानाही पवारांनी त्यांना तिकीट दिल्याचे, तसेच निवडून आणल्याची आठवण करून दिली आहे. तर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट हल्लाबोल चढवला आहे. राष्ट्रवादीने उदयनराजेंचा पराभव 1999 मध्येच केला आहे. नंतरच्या काळात उदयनराजेंच्या मातोश्रींनी (कल्पनाराजे भोसले) विनंती केल्यानेच शरद पवार यांनी पक्षाचे तिकीट दिले होते, असे स्पष्ट करून उदयनराजेंसाठी पक्ष अनुकूल नव्हता, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com