अजित पवारांच्या स्वप्नावर नवाब मलिकांनी टाकला अधिकृत पडदा

अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, याची शक्यता सध्या तरी मावळली आहे.
ajit pawar could not become cm
ajit pawar could not become cm

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज अधिकृतरित्या पडदा टाकला. शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या तीनही पक्षांच्या आघाडीत शिवसेनेकडेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार असल्याचे मलिक यांनी टिव्ही वाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचा अडीच वर्षे मुख्यमंत्री होणार किंवा तशी पक्षातून मागणी असल्याच्या बातम्या म्हणजे अफवा आहेत, अशा स्पष्ट शब्दांत मलिक यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. म्हणजेच राष्ट्रवादीच्या वाट्याला हे राज्यातील क्रमांक एकच पद येणार नाही. पर्यायाने अजित पवार यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न हे सध्या तरी स्वप्नच राहणार आहे.

“मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर उत्तम, ते सरकारचा चेहरा ठरु शकतात. 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री सेनेचा असेल, आम्ही पाठींबा देऊ”, असं नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक म्हणाले, “सत्तासंघर्ष संपला आहे. आज 4 वाजता बैठक आहे. सगळं ठरलं की दोन दिवसांत राज्यपालंकडे जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा करु. ते लक्ष देतील ही अपेक्षा आहे.” किमान समान कार्यक्रमाचा अजेंडा आज फायनल होईल. दोन दिवसात गुड न्यूज मिळेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. राष्ट्रवादीला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद हवं आहे का, असा प्रश्न विचारला असता, त्या केवळ चर्चाच आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं नवाब मलिक म्हणाले. महारष्ट्रात आघाडी करताना नवं नाव ठरवू. युती केल्यानंतर पक्षाचं नाव ठेवण्यात येत नाही. हे थोतांड मीडियानं पसरवलं आहे, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला. सरकार धर्मनिरपेक्ष असेल, महाराष्ट्राला विकास हवा आहे. पवारांनी दिल्लीच्या चाणक्यला दाखवून दिलं की नाद करायचा नाही, असं म्हणत नवाब मलिकांनी अमित शहांवर निशाणा साधला.

राज्याच्या इतिहासात आतापर्यंत जे उपमुख्यमंत्री राहिले ते परत मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. नाशिकराव तिरपुडे, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, अजित पवार असे आतापर्यंत उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यातील अनेकांकडे मुख्यमंत्री होण्याची क्षमता होती व आहे. मात्र त्यांना उप या पदावरच समाधान मानावे लागले. अजित पवारांना हा इतिहास बदलण्याची संधी आली होती. तशी त्यांच्या समर्थकांनी तयारीही केली होती. मात्र पक्षाच्या नेत्यांनी या आघाडीत दुय्यम भूमिका स्वीकारण्याचे मान्य केल्याने त्यांचा नाईलाज झाला. 

“मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर उत्तम, ते सरकारचा चेहरा ठरु शकतात. 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री सेनेचा असेल, आम्ही पाठींबा देऊ”, असे नवाब मलिक यांनी सांगितले. दोन दिवसांत राज्यपालंकडे जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा करु. किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा आज निकालाक निघेल. आज फायनल होईल. दोन दिवसात गोड बातमी मिळेल, असाही दावा मलिक यांनी केला. सरकार धर्मनिरपेक्ष असेल, महाराष्ट्राला विकास हवा आहे. पवारांनी दिल्लीच्या चाणक्यला दाखवून दिलं की नाद करायचा नाही, असे म्हणत  मलिकांनी अमित शहांवर निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com