नवाब मालिकांचा गडकरींना टोला, केले ना पवार साहेबांनी क्लीन बोल्ड ? 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात भाजप पिछाडीवर जात असल्याचे पाहून नितीन गडकरी यांनी'राजकारणात आणि क्रिकेटमध्ये कधीही काहीही घडू शकते."असे विधान केले होते.
sharad_pawar_nitin_gadkari.
sharad_pawar_nitin_gadkari.

पुणे : "शरद पवार यांनी बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. हे नितीन गडकरी विसरले होते का? केले ना पवार साहेबांनी क्लीन बोल्ड ? "असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लगावला आहे.

"राजकारण आणि क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते,"असे नितीन गडकरी यांनी म्हटले होते. त्यावर मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात भाजप पिछाडीवर जात असल्याचे पाहून नितीन गडकरी यांनी'राजकारणात आणि क्रिकेटमध्ये कधीही काहीही घडू शकते."असे विधान केले होते. शनिवारी सकाळी त्यांच्या या विधानाचा प्रत्यय आला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांनी घेतली.हे सगळं अनपेक्षित होतं. अजित पवारांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली होती.

मात्र शनिवारपासून राज्यात अनेक घडामोडी घडल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत रणनीती आखली. त्याचवेळी या तिन्ही पक्षातील आमदार फोडण्यासाठी भाजपने 'ऑपरेशन लोटस' ही मोहीम आखली मात्र तिन्ही पक्षाच्या एकीपुढे भाजपचा टिकाव लागणार नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली. 

सर्वोच्च न्यायालयाने भाजपला बुधवारी बहुमत सिद्ध करा असे आदेश दिले. भाजपकडे संख्याबळ नव्हते. त्यात अचानकपणे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडाचे निशाण खाली करत पदाचा राजीनामा दिला. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला.या घडामोडीनंतर नितीन गडकरी यांच्या विधानाला मलिक यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

"शरद पवार यांनी आय सी सी च्या अध्यक्षपदावर काम केले आहे हे गडकरी विसरले असतील. केला ना क्लीन बोल्ड?"असा टोला त्यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com