`भाजप सत्तेवर येणार? छे! उलट भाजपचे नेते सरकारच्या संपर्कात`

`भाजप सत्तेवर येणार? छे! उलट भाजपचे नेते सरकारच्या संपर्कात`

...

मुंबई ः दिल्ली विधानसभा निवडणुक संपल्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात "ऑपरेशन लोटस' राबविण्याबाबत भाजपनेते विचार करत असल्याची चर्चा असताना भाजपचेच नेते सरकारच्या संपर्कात असल्याचा दावा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सरकारला धक्‍का देण्यासाठी भाजप नेते सरसावले असल्याची चर्चा आहे. या संदर्भात भाजपच्या काही नेत्यांनी सुचक विधाने केली आहेत. मात्र महाविकास आघाडीने या संदर्भातील शक्‍यता फेटाळून लावली आहे. भाजपची लाट ओसरली आहे. अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्यास उत्सुक आहेत. आठवड्याभरात मोठे फेरबदल पाहायला मिळतील, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागतील, असे वक्तव्य केले होते. देवेंद्र फडणवीसही सत्तापालट होण्याविषयी बोलत आहेत. या संदर्भात बोलताना नवाब मलिक म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात `कमल खिलेगा` कार्यक्रम सुरु होणार, ही बातमी पेरली जात आहे. मात्र मोदी लाट ओसरली आहे. दिल्लीत महाराष्ट्रातील भाजप नेते प्रचार करत आहेत, पण महाराष्ट्रातच यांची बोट बुडणार,अशी टीका नवाब मलिक यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

कॉंग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवलेल्या नेत्यांनाही पक्ष बदलायचा आहे. ज्यांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्यावरही अन्याय झाला. त्यामुळे तेही पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत आहेत, असे म्हणत नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. भाजपचे नेते आणि माजी मंत्री महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी ते उत्सुक आहेत. एका आठवड्यात मोठे फेरबदल पाहायला मिळतील, असा दावा मलिक यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com