उदयनराजेंना 1999 मध्ये पराभूत केलंय, आता पुन्हा करू!

उदयराजेंनी पार्टीला कमजोर करण्याचे प्रयत्न सातत्याने केले.
उदयनराजेंना 1999 मध्ये पराभूत केलंय, आता पुन्हा करू!

पुणे:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन झाल्यानंतर 1999 मध्ये उदयनराजे भोसले यांना साताऱ्यात पराभूत केले आहे. आता लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत करू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
 
उदयनराजे भाजपमध्ये गेल्यामुळे सातारा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष कोणाला आखाड्यात उतरवणार, अशी चर्चा सुरू असताना मलिक  यांनी उदयनराजेंना धूळ चारण्याची भाषा केली आहे. 

मलिक म्हणाले, 1999 मध्येच उदयनराजेंचा राष्ट्रवादीने पराभव केला आहे. पुढील काळात त्यांच्या मातोश्रींच्या विनंतीमुळे पवार साहेबांनी त्यांना तिकीट दिले होते. मात्र उदयराजेंनी पार्टीला कमजोर करण्याचे प्रयत्न सातत्याने केले. त्यामुळे येणारी पोटनिवडणूक आम्ही ताकदीने लढवू आणि त्यात उदयनराजेंचा पराभव करू. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com