शिवसेनेला सोबतच घेऊन जावू कॉंग्रेसशी चर्चा करू : नवाब मलिक 

 शिवसेनेला सोबतच घेऊन जावू कॉंग्रेसशी चर्चा करू : नवाब मलिक 

पुणे : सरकार स्थापनेचे सर्व अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले आहेत. पवारसाहेब कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करीत असून मुंबईत काही वेळातच बैठक होईल. कॉंग्रेससोबत चर्चा करून निर्णय घेऊ. तीन पक्ष घेऊनच सरकार स्थापन होऊ शकते अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली. 

ते म्हणाले, आज पक्षाच्या आमदारांची पुन्हा बैठक झाली आहे. यावेळी अजित पवार, जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे. सत्ता स्थापनेसाठी आम्ही कॉंग्रेसबरोबर चर्चा करीत आहोत. पक्ष स्थापन करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाळ आणि अहमद पटेल मुंबईत येत असून चर्चा होणार आहे. राजभवनाने आता तरी राष्ट्रपती राजवटीची घोषणा केली नसल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com