navodita ghatge campaigns for samarjitsinh ghatge | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

आपत्तीत जनतेसोबत राहिलेल्या समरजितसिंह घाटगे यांना निवडून द्या - नवोदिता घाटगे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

महापुरासह जनतेवरील विविध आपत्तीवेळी जनतेसोबत राहिलेल्या समरजित घाटगे यांना निवडून द्या, असे आवाहन नवोदिता घाटगे यांनी केले. त्या कागल परिसरातील महिला संपर्क बैठकीत बोलत होत्या. 

कागल : महापुरासह जनतेवरील विविध आपत्तीवेळी जनतेसोबत राहिलेल्या समरजित घाटगे यांना निवडून द्या, असे आवाहन नवोदिता घाटगे यांनी केले. त्या कागल परिसरातील महिला संपर्क बैठकीत बोलत होत्या. 

नवोदिता घाटगे म्हणाल्या, ""कागलच्या विकासासाठी व महिलांना भयमुक्त करण्यासाठी समरजितसिंह घाटगे अहोरात्र झटत आहेत. ही लढाई स्वाभिमानाची व जनतेच्या विश्वासाची आहे. जनभावनेचा आदर राखणेसाठी ते जनतेच्या एबी फॉर्मवर ही निवडणूक लढवत आहेत. त्यांना सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. ते जनतेच्या सुख-दुःखात सहभागी झाल्याने संपूर्ण मतदारसंघातील जनता राजेंच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. कपबशी चिन्हासमोरील बटण दाबून समरजितसिंह घाटगे यांना मताधिक्‍याने निवडून द्यावे.'' 

नवोदिता घाटगे यांनी कागल परिसरातील जयसिंगराव पार्क, श्रमिक वसाहत, शाहू कॉलनी, हणबर गल्ली, अनंत रोटो, पिष्टे गल्ली, आंबील कट्टी, जाधव मळा, आंबेडकर नगर, काळमवाडी वसाहत, कोरवी वसाहत या भागात महिला बैठकीचा दौरा केला. त्यांच्यासोबत कागलच्या नगरसेविका, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख