नवोदिता घाटगे बनल्या स्टार प्रचारक  - Navodita Ghatge becomes star campaigner | Politics Marathi News - Sarkarnama

नवोदिता घाटगे बनल्या स्टार प्रचारक 

सरकारनामा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नवोदिता समरजितसिंह घाटगे यांनी प्रचाराची बहुतांशी जबाबदारी पेलली आहे. त्याच समरजितसिंह घाटगेंच्या स्टार आणि ब्रॅण्ड प्रचारक बनल्या आहेत.

कोल्हापूर : नवोदिता समरजितसिंह घाटगे यांनी प्रचाराची बहुतांशी जबाबदारी पेलली आहे. त्याच समरजितसिंह घाटगेंच्या स्टार आणि ब्रॅण्ड प्रचारक बनल्या आहेत.

एका यशस्वी पुरुषामागे त्यांची अर्धांगिनी  असते असे म्हटले जाते. नवोदिता घाटगे यांनी हे प्रत्यक्षात पटवून दिल्याचे कागल विधानसभा मतदारसंघात दिसून येते. 

समरजितसिंह घाटगे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. साडेतीन वर्षा पूर्वीपासून स्वतः समरजितसिंह घाटगे मतदारसंघात भिंगरीसारखे फिरत आहेत. मतदारांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. 

एवढंच नव्हे तर त्यांच्या पेक्षा त्यांची अर्धांगिनी  अर्थात नवोदिता घाटगे यांनी महिलांचे मोठे संघटन केले आहे. आज मतदारसंघात असलेली घट्ट पकड याचे बहुतांशी श्रेय नवोदिता घाटगे यांना जाते. मतदारसंघातील एक एक भाग रोज त्यांनी पिंजून काढला आहे. 

नवोदिता घाटगे आणि समरजितसिंह घाटगे या दोघांची स्वतंत्र टीम कार्यरत आहे. ही टीमच त्यांना दुसऱ्या दिवशीचे नियोजन आदल्या दिवशी रात्री हातात देते. त्याच प्रमाणे पुढील प्रचार होतो. नवोदिता घाटगे यांनी ठेवलेले त्यांचे ध्येय आणि महिलांनी त्यांना दिलेला प्रतिसाद पाहता घाटगेंच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा असणार आहे. 

मतदारसंघातील कोणत्या भागात त्या पोहचल्या नाहीत असा एकही भाग नाही. प्रत्येक भागात जाऊन त्यांनी दोन-तीन वेळा महिलांशी संवाद साधला आहे. रोज सकाळी सात वाजता नवोदिता घाटगे दैनंदिनीला सुरूवात करतात. मतदारसंघातील एक अन्‌ एक गाव आणि तेथील महिला, त्यांचे प्रश्‍न त्यांना पाठ आहेत.  त्यांच्या सभांना गर्दी असते. 

त्यांच्यासोबतच आई सुहासिनीदेवी घाटगे, चुलत भाऊ वीरेंद्रसिंह घाटगे, काका प्रवीणसिंह घाटगेही प्रचारात सक्रीय आहेत. महत्वाच्या बैठका घेणे, मतदार संघातील हालचालींवर लक्ष ठेवणे, महत्वाच्या मुद्यांबाबत थेट समरजितसिंह घाटगे यांच्याशी चर्चा करणे, मतदारसंघातील राजकरण, प्रश्‍न, प्रमुख नेतेमंडळी यांच्याशी संपर्कात राहण्याचे काम कुटुंबातील इतर सदस्य करीत आहेत. एकंदरीतच राजघराणे असलेले घाटगे कुटुंबीय आता प्रचारात रंगल्याचे दिसून येते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख